Breaking News

शिरूर कासार नगरपंचायतच्या वतीनं ४४ अपंगांना किराणा किटचे वाटप


किराणा सामान किटचे वाटप करून मुख्याधिकारी किशोर सानप यांनी राबवला स्तूल्य उपक्रम !

बाळकृष्ण मंगरुळकर । शिरूर कासार

शिरूर कासार नगर पंचायत च्या वतीने सोमवार दिनांक १७ रोजी नगरपंचायत मध्ये नोंद असलेल्या ४३ अपंगांना किराणा किटचे वाटप करण्यात आले.

दरवर्षी नगरपंचायत च्या जमा झालेल्या एकूण वसुली मधून ५% निधी हा अपंगासाठी देण्यात येत असतो. परंतु त्यामधून या वर्षी रोख रक्कम स्वरूपात न देता एकूण ४४ अपंग नागरिकांना किराणा सामान किट दिले आहे. तसेच शहरात नगरपंचयतकडे नोंद केलेले ४३ व नोंद नसलेला 1 असे ऐकून ४४ अपंग नागरिक असून त्यांना यावर्षी रोख निधी न देता  ११४५ रुपये किंमतीचे किराणा सामान किट देण्यात आल्या आहेत.

त्यानुसार ४४ किटचे एकूण रक्कम ५०३८० रुपये चा अपंगाचा निधी वाटप करण्यात आला आहे. यावेळी मुख्याधिकारी किशोर सानप यांच्या समवेत नगरपंचायतचे लेखापाल चंद्रकांत दामोदर कर्मचारी नामदेव घुगे, संजय गायकवाड, सुनील शेटे, कौसर शेख,शरद गवळी, बाळू तगर, भाऊसाहेब मोरे, अनिल जगताप, शहादेव गायकवाड व इतर उपस्थित होते.


लॉकडाऊन मुळे किराणा सामान किट वाटप!

कोरोना संसर्ग रोगाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे सर्वत्र लॉकडाऊन करण्यात आले असल्यामुळे शिरूर कासार नगर पंचायत च्या वतीने दरवर्षी वसुली करण्यात आलेल्या रक्कम मधील 5℅ रक्कम ही अपंगांसाठी वाटप करण्यात येते त्यामध्ये आमच्याकडे नोंदणीकृत असलेले 44 अपंग व्यक्तींना यावर्षी रोख रक्कम न देता किराणा सामान किट देण्यात आल्या आहेत.

- किशोर सानप - नायब तहसिलदार तथा मुख्याधिकारी , नगर पंचायत शिरूर कासार.

No comments