Breaking News

अक्षय तृतीयाच्या मुहुर्तावर होणारा बालविवाह रोखण्यात महिला व बाल विकास विभागाला यश..!

बीड  :  बीड जिल्ह्यातील परळी तालुक्यात एक बालविवाह होत असल्याबाबत दि. 13 मे रोजी गुप्त माहिती बीड चे जिल्हा महिला व बालविकास अधिकारी श्री व्ही.एम. हुंडेकर यांना मिळाली. त्या माहितीच्या आधारे जिल्हा महिला व बालविकास अधिकारी हुंडेकर यांनी सिरसाळा येथिल ग्राम बाल संरक्षण समितीशी संपर्क साधला. आणि बालविवाह रोखण्यास सांगितले ग्राम बाल संरक्षण समिती सिरसाळा यांनी प्रकरणाची चौकशी केली आणि सिरसाळा पोलीस स्टेशन यांच्या मार्गदर्शनाखाली आज अक्षय तृतीया च्या मुहुर्तावर होणारा बालविवाह रोखण्यात यशस्वी झाले.

पुणे स्थित महाराष्ट्र राज्य बाल संरक्षण संस्थेच्या कार्यक्रम व्यवस्थापक तथा उपायुक्त  श्रीमती मनिषा बिरारीस यांच्या सुचनेनुसार अक्षय तृतीया च्या मुहुर्तावर बीड जिल्ह्यात होणा-या बालविवाहावर जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी , बीड  श्री व्ही.एम.हुंडेकर यांची करडी नजर होती. त्यामुळे त्यांनी यंत्रणा सज्ज केली होती.त्यानुसार त्यांना परळी तालुक्यातील सिरसाळा येथिल मुलांबरोबर शिरूर तालुक्यातील एका अल्पवयीन बालिकेचा विवाह शुक्रवार दि. 14/05/2021 रोजी होत असल्याबाबत माहिती प्राप्त झाली होती.त्याबाबत सिरसाळा ग्राम बाल संरक्षण समिती सदस्य यांनी प्रत्यक्ष कुटुंब भेट घेऊन तेथील माहिती घेतली व हा बालविवाह  आहे अशी खात्री झाल्यामुळे हा बालविवाह रोखण्यात आला आहे. 

 बालविवाह होणा-या मुलाच्या व मुलींच्या कुटुंबातील सर्व सदस्यांना बालविवाह प्रतिबंधक कायद्यानुसार होणारी कारवाई व कमी वयात मुलींचे लग्न केल्यामुळे मुलींच्या शारीरिक व मानसिक बाबतीत होणारे नुकसान याबाबत सामाजिक कार्यकर्ते श्री बाजीराव ढाकणे  यांनी सविस्तर माहिती दिली.अशाप्रकारे मौजे सिरसाळा येथे होणारा बालविवाह ग्राम बाल संरक्षण समितीच्या समन्वयाने जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी श्री व्ही.एम.हुंडेकर यांच्या सतर्कतेने रोखाला व मुलींच्या कुटुंबांचे समुपदेशन करून मुलींचे वय अठरा वर्षे पूर्ण झाल्याशिवाय तीचा विवाह करणार नाही असे दोन्ही कुटुंबींयाकडुन जबाब नोंदवून घेतले आहेत. बाल विवाह केला तर होणारे परिणाम व शिक्षा याबाबत सामाजिक कार्यकर्ते बाजीराव ढाकणे यांनी सांगितले. 

महाराष्ट्र शासनाच्या महिला व बाल विकास विभागांतर्गत कार्यरत असलेले जिल्हा बाल संरक्षण कक्ष , बीड व जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालय बीड हे महिला व बालकांच्या बाबतीत वेगवेगळ्या योजना व अधिनियमाची अंमलबजवणी करून याबाबतीत सतर्कतेने कामकाज करीत असते. 

श्रीमती मनिषा बिरारीस कार्यक्रम व्यवस्थापक ,महाराष्ट्र राज्य बाल संरक्षण संस्था पुणे कडून प्राप्त सुचनेनुसार व माहितीनुसार अक्षय तृतीया च्या मुहुर्तावर होणारा परळी तालुक्यात आयोजित एका 17 वर्षीय अल्पवयीन बालिकेचा  दि.14//05/2021 रोजी होणारा बालविवाह रोखण्यात श्री व्ही एम हुंडेकर , जिल्हा महिला व बालविकास अधिकारी बीड सिरसाळा येथिल कर्तव्यदक्ष ग्राम बाल संरक्षण समितीच्या पदाधिकारी व सिरसाळा पोलीस यांच्या मार्गदर्शनाखाली हा बालविवाह रोखण्यात यशस्वी झाले. 

स्थानिक अंगणवाडी सेविका यांच्या मदतीने अल्पवयीन बालिकेचे आई-वडिल व कुटुंबियांचे समुपदेशन करून बाल विवाह प्रतिबंध कायद्यांतर्गत हमीपत्र लिहून घेण्यात आले. यावेळी पोलीस हेड कॉन्स्टेबल मिसाळ, ग्रामविकास अधिकारी शेख, ग्राम बाल संरक्षण समितीच्या अलकाताई देशमुख यांच्या सह अनेक सहकारी उपस्थित होते.

 यावेळी उपस्थितांमध्ये कोरोना आजारा संबंधात काळजी घेऊन सामाजिक दुरावा ठेवण्याची काळजी घेण्यात आली. यापुढे अशा प्रकारचे कोणतेही बालविवाह होत असल्यास चाईल्ड लाईन च्या १०९८ या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधून नागरिकांनी माहिती देण्याचे आवाहान जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी श्री व्ही एम हुंडेकर यांनी केले आहे.

No comments