Breaking News

एकमेव भाजपाचे आ.सुरेश धस चालवतात १३ कोविड सेंटर रात्रंदिवस न थकता अविरतपणे आ. सुरेश धस यांचे कार्य सुरू...

के. के. निकाळजे । आष्टी 

अडचणीत सापडलेल्या सामान्यांच्या मदतीसाठी प्रसंगी कठोर भूमिका घेणारे भाजप आमदार सुरेश धस आता मतदार संघातील कोरोनाग्रस्तांच्या मदतीसाठी धाऊन आले आहेत. आ.सुरेश धस विश्वस्त असलेल्या मच्छिंद्रनाथ देवस्थान व आष्टी तालुका दुध संघ कृषी उत्पन्न बाजार समिती कडा यांच्या मदतीने त्यांनी आष्टी - पाटोदा -शिरुर कासार या तीन तालुक्यांत तब्बल १३ कोविड केअर सेंटरची उभारणी केली आहे. एकाच वेळी एवढ्या मोठ्या प्रमाणात कोरोना केंद्र सुरू करणारे ते बहुदा राज्यातील एकमेव आमदार असावेत, असे बोलले जाते. या काळात रात्रंदिवस न थकता अविरतपणे धडपडणारा हा नेता, सामान्य माणसाशी कायम नाते ठेवणारा आणि इथल्याशी जिव्हाळा बांधून अविरतपणे या कार्यात आ. सुरेश धस यांनी कोरोना काळात झोकून दिले आहे.


मागच्या वर्षी कोरोना विषाणू संसर्गामुळे लॉकडाऊन जाहीर झाले आणि ऊसतोड मजूरांना जिल्ह्यात येण्याचा प्रश्न निर्माण झाला. तेव्हा त्यांच्या मदतीला धाऊन जाताना भाजपाचे आ.धस यांनी स्वत:वर गुन्हे दाखल झाले तरी पर्वा केली नाही. त्याचबरोबर बिबट्याच्या काळात भयभीत झालेल्या जनतेला सर्वात पुढे येऊन आधार देणारे आ.सुरेश धसच होते.सर्व सामान्य अडचणीत नेहमी तारणहार म्हणून उभे राहणारे नेतृत्व आत्ता कोरीना काळात मदतीचा सामाजिक जनसेवेचा वसा मतदारसंघात १३ कोविड सेंटर चालवीत सामाजिक बांधिलकीचे दर्शन घडवून आणतांना आ. सुरेश धस हे पुढाकार घेत आहेत. जिल्ह्यातील पहिला रुग्ण आष्टी तालुक्यात आढळल्यानंतर भितीचे वातावरण निर्माण झाले. परंतु,गाव कंटेनमेंट झोन असतानाही लोकांची भिती दुर करायला ते बाहेर पडले. तेव्हा देखील त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. 

दुसरी लाट सुरु झाली आणि लॉकडाऊन जाहीर झाल्यानंतर व्यापाऱ्यांसाठी सविनय कायदेभंगाची आक्रमक भूमिकाही आ.धस यांनी घेतली होती. दुसऱ्या लाटेत रुग्णसंख्या झपाट्याने वाढू लागली आणि सगळ्यांची धावाधाव सुरु झाली. आष्टीच्या रुग्णांना  नगर जवळ किंवा जिल्हा रुग्णालयात यायचे म्हटले तर शंभर किलोमिटरहून अधिक अंतर पार करावे लागायचे. रुग्णांचे हाल पाहून पुन्हा आ.धस कोरोनाग्रस्तांच्या मदतीला धावले.

हजारो रुग्णावर उपचार सुरू

 मच्छिंद्रनाथ देवस्थान व आष्टी तालुका दुध संघाच्या माध्यमातून आष्टी मतदार संघातील आष्टी, शिरुर कासार व पाटोदा तालुक्यात  त्यांनी आतापर्यंत १३ कोविड केअर सेंटरची उभारणी केली. काही कोविड केअर सेंटरच्या खाटांची क्षमता ५० तर काही कोविड केअर सेंटरची क्षमता १०० तर काही ठिकाणी १५० खाटांची क्षमता आहे. यामुळे साधारण हजारांवर रुग्णांच्या उपचाराची मोफत सोय झाली आहे.आणि अनेक रुग्ण बरे होऊन गेले आहेत. त्यांना तज्ज्ञ डॉक्टर आणि मनुष्यबळासाठी आरोग्य विभागानेही मदत केली आहे.


No comments