Breaking News

मागासवर्गीय पदोन्नतीतील घेतलेला अन्यायकारक निर्णय रद्द करण्यात यावा : संदिप जाधव

आष्टी : राज्य सरकारने आरक्षण शिवाय सेवाजेष्ठतानुसार मागासवर्गीय पदोन्नतीतील सर्व रिक्त जागा भरण्याचा घेतलेला अन्यायकारक निर्णय रद्द करण्यात यावा अशा आशयाचे निवेदन तहसील कार्यालय आष्टी यांना आँल इंडिया पँथर सेनेच्या वतीने देण्यात आले आहे. यापूर्वी सुप्रीम कोर्टाने पदोन्नतीतील देण्याचा अधिकार राज्यांना दिला आहे.

त्यामुळे राज्य सरकारने मागासवर्गीय कायदेतज्ञांची समिती स्थापन करून त्यांच्या शिफारशी लक्षात घेऊन पदोन्नतीतील आरक्षण देण्यासाठी साकारात्मक पाऊले उचलावीत, अन्यथा आपणास कोणालातरी खुश करायचे आहे आणि त्यामुळेच आपण आमच्या संविधानिक अधिकाराचा बळी देत आहात असा आमचा समज होईल. 

तरी हा शासण निर्णय त्वरित रद्द करून सरकारने पदोन्नतीतील आरक्षण देऊन शासनाचा सन्मान करावा, अन्यथा मागासवर्गीय समाज घेऊन आँल इंडिया पँथर सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष मा दिपक भाऊ केदार यांच्या नेतृत्वाखाली राज्यव्यापी तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा आँल इंडिया पँथर सेनेचे आष्टी तालुकाध्यक्ष तथा पत्रकार संदिप जाधव यांनी दिला आहे. या निवेदनावर शिशुपाल साळवे युवा तालुकाध्यक्ष, संतोष जाधव कडा शहर अध्यक्ष, अभिषेक शिंदे, सनी निकाळजे, सुमीत जाधव, दादा जाधव, गणेश घोडके आदींच्या सह्या आहेत. 


No comments