Breaking News

केज-धारूर रोडवर वाटमारी प्रकरणातील तीन संशयितांना तीन दिवसांची पोलीस कोठडी

गौतम बचुटे । केज

रस्त्याने प्रवास करीत असलेल्या मोटार सायकलस्वारास अडवून मोबाईल व खिशातील पैसे काढून घेत मारहाण केल्याच्या वाटमारीच्या घटनेतील तीन संशयित आरोपीना तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. 

या बाबतची माहिती अशी की, दि . १० मे सोमवार रोजी रात्री ११:०० वा च्या दरम्यान केज धारूर रोडवर तांबवा पाटी जवळ गौतम ज्ञानोबा भालेराव हे  चोरंब्याकडे मोटार सायकलवरून जात होते त्यावेळी कासारी पाटीच्या पुढे तांबवा हद्दीत एका काळ्या स्कुटीवरून प्रवास करणाऱ्या तिघांनी त्यांना स्कुटी आडवी लावून त्यांच्या खिशातील रोख ५ हजार ७०० रु. आणि रिअल-मी कंपनीचा मोबाईल असे एकूण १२ हजार ७०० रु. चा मुद्देमाल वाटमारी करून लुटून नेला होता. 

पोलीस निरीक्षक प्रदीप त्रिभुवन यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष मिसळे, तपास पथक (डिबी) प्रमुख पोलीस उपनिरीक्षक श्रीराम काळे आणि केज पोलिसांच्या गुन्हे तपास शाखेचे दिलीप गित्ते, महादेव बहिरवाळ, अशोक नामदास, गृह रक्षक दलाचे जवान बाळासाहेब थोरात यानी अथक परिश्रम घेऊन सर्व माहिती व परिसरातील गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेले आरोपी यांची माहिती तसेच गुप्त खबऱ्या मार्फत मिळालेल्या महिती आधारे धारूर येथील अनिल उर्फ मंगेश बालाजी सोनटक्के (वेटर, अशोकनगर, धारूर), शिवराम वैजनाथ बोबडे (मजुरी, संभाजी नगर धारूर), रेवन सोपान नखाते (खाजगी व्यवसाय, कसबा विभाग मड गल्ली धारूर) या तिघांना संशयावरून ताब्यात घेतले. 

त्यांना दि. २४ मे रोजी केज न्यायालया समोर हजर केले असता त्या तिघांना दि. २६ मे पर्यंत तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. त्यांच्या कडून मुद्देमाल व गुन्ह्यात वापरलेली स्कुटी हस्तगत केली आहे. तसेच त्यांच्या कडून आणखी गुन्ह्याची उकल होण्याची शक्यता आहे. 

No comments