Breaking News

गुरुवारी पात्रुड येथे ज्येष्ठ नागरिकांसाठी कोरोना प्रतिबंधक लस देण्यात येणार ४५ वर्षावरील नागरिकांनी आज नोंद करावी - डाॅ. याज्ञिक रणखांब

   

पात्रुड : माजलगाव तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र पात्रुड येथे 600 कोरोना प्रतिबंधक लस उपलब्ध झाली असून या  भागातील 45 वर्षावरील नागरिकांनी आज नोंदणी करावी असे आवाहन प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. याज्ञिक रणखांब यांनी केली आहे. 

प्राथमिक आरोग्य केंद्र पात्रुड येथे मोठ्याप्रमाणात लस उपलब्ध झालेली असून प्रशासनाच्या नियमानुसार आज बुधवारी सर्व लस घेणाऱ्यांनी नोंदणी करणे आवश्यक आहे त्या अनुषंगाने आज बुधवारी प्राथमिक आरोग्य केंद्र पात्रुड येथे असलेल्या नोंदणी केंद्रावर आपले नाव प्रतिक्षा यादीवर नोंदणी करून उद्या दिनांक सहा गुरुवार रोजी या सर्वांना लस देण्यात येणार आहे. 

नोंदणी रजिस्टर वरील अनुक्रमा प्रमाणे ज्येष्ठतेनुसारच लस देण्यात येणार आहे. लसीकरणा दिवशी गर्दी न होता सुलभतेने लसीकरण करण्यात यावे तसेच प्रतिक्षा यादीवरील नोंदणी नुसार पहिला व दुसरा डोस चे नियोजन होण्यासाठी आज नोंदणी करणार्या ज्येष्ठ नागरिकांनाच केवळ लस मिळणार आहे. त्याकरिता पात्रुड प्राथमिक आरोग्य केंद्र अंतर्गत सर्व गावातील ज्येष्ठ नागरिकांनी पात्रुड प्राथमिक आरोग्य केंद्रात नोंद करण्याचे आवाहन वैद्यकीय अधिकारी डॉ. रणखांब यांनी केले आहे.


No comments