Breaking News

सोळा दिवसापासून हेल्पलाईन सुरू; १८७ जणांना दिले बेड मिळवून आ.सुरेश धसांच्या "वॉररूम" मध्ये ३९५ जणांचा मदतीचा हात; २४ तास सुरू असते सेवा

आष्टी : कोरोना संसर्ग झालेल्या रूग्णाची व्यवस्था करतांना नातेवाईकांची प्रचंड तारांबळ उडत आहे.या पार्श्वभूमीवर भाजपाचे आमदार सुरेश धस यांनी २४ सुरू केलेल्या वार रूमची ३९५ जणांना मदत झाली आहे.हेल्पलाइनच्या माध्यमातून संपर्क केल्यानंतर बेडची पुर्तता सोबतच औषध आणि रूग्णवाहिकेची व्यवस्था आ. धस यांच्या माध्यमातून झाल्याने अनेकांना दिलासा मिळाला आहे.

             कोरोना संसर्ग प्रचंड वाढल्यानंतर मार्च आणि एप्रिल महिना अनेकांसाठी वेदनादायी ठरला.अनेकांना रूग्णालयात बेड उपलब्ध झाले नाहीत.बेड मिळाले तर ऑक्सीजन नव्हते,ऑक्सीजन असले तर व्हेटींलिटर नव्हते.काहिंना रेमडीसीवीर इंजेक्शनचा पाठपुरवठा होऊ शकला नाही.अशा ब-याच जणांना उपचार मिळू न शकल्याने जीव गमवावा लागला.एकीकडे शासकीय यंञणेचा ताण जास्त वाढल्याने आशा परिस्थितीत रूग्ण व रूग्णांच्या नातेवाईकांना कोणाची मदत घ्यावी असा प्रश्न निर्माण होत होता.अशा आपत्कालीन परिस्थितीत भारतीय जनता पक्षाचे आमदार सुरेश धस यांनी गेल्या सोळा दिवसापुर्वी वॉर रूमची स्थापना केली होती.व २४ तास सेवेत औषधे,बेड,रूग्णवाहिका,अंत्यसंस्कारासाठी व्यवस्था,अशा विविध पातळींवर येणाऱ्या समस्यांचे निरासन करण्यासाठी समित्यांचे गठण करण्यात आले होते.दि.१० मे रोजी आमदार सुरेश धस यांच्या निवासस्थानीच समितीसाठी वॉर रूम करण्यात आली.गेल्या सोळा दिवसात या माध्यमातून ३९५ जणांना मदत मिळवून देण्यात यश आल्याचा दावा आ.सुरेश धस हेल्पलाईन प्रमुखांनी केला आहे.

अशी आहे कार्यपध्दती

आमदार सुरेश धस यांनी आपल्या निवासस्थानी सुरू केलेल्या हेल्पलाईनचा क्रंमाक 8446 12 4024 या क्रंमाकावर संपर्क साधल्यानंतर संबंधित रूग्णांची असलेली अडचणीची नोंद घेतली जाते.त्यानंतर संबधीत रूग्णांना एक तासाच्या आत असलेली अडचण उदा.बेड,रूग्णवाहिका,रेमडीसीवीर इंजेक्शन,सिटी स्कॅन यासह आदि प्रश्न या हेल्पलाईनच्या माध्यमातून सोडविले जातात.

सोळा दिवसात साधला ३९५ जणांनी संपर्क

१० मे पासून सुरू करण्यात आलेल्या हेल्पलाइनच्या माध्यमातून आत्तापर्यंत  ३९५ जणांनी संपर्क साधला आहे.या संपूर्ण सेवा कार्यात १८७ जणांना बेड,१९५ रूग्णांसाठी रेमडीसीवीर इंजेक्शन,३५ जणांना रूग्णवाहिका तर आष्टी आणि मुर्शदपूर भागात बेवारस रूग्ण म्हणजे एकदा उपचारासाठी आणून रूग्णालयात सोडले आणि नातेवाईक फिरकलेच नाहीत अश्या आठ जणांवर अत्यंसंस्कार करण्यात येऊन एकूण सोळा दिवसात ३९५ जणांचे हेल्पलाइनच्या माध्यमातून प्रश्न मार्गी लावले आहेत. 

No comments