Breaking News

प्राचार्या सौ.रेखा परळीकर यांचे निधन

परळी :   पूर्णा नगर परिषदेच्या माजी नगराध्यक्ष तथा परळी येथील लक्ष्मीबाई देशमुख महिला महाविद्यालयाच्या प्राचार्या सौ. रेखा जनर्धनराव परळीकर- गव्हाणे यांचे  सोमवार दिनांक 17 मे 2021रोजी सायंकाळी औरंगाबाद येथील एका खाजगी रुग्णालयात उपचारादरम्यान निधन झाले. मृत्यूसमयी त्यांचे वय 57 वर्षे होते. 

त्यांच्या पश्चात पती भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते माजी आमदार ऍड. विजय गव्हाणे एक मुलगी व अन्य नातेवाईक असा मोठा परिवार आहे. प्राचार्य परळीकर औरंगाबाद विद्यापीठाच्या सिनेट सदस्य होत्या. एक अभ्यासू असे व्यक्तिमत्व म्हणून शैक्षणिक क्षेत्रात सुपरिचित होत्या. त्यांचे राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्तरावर अनेक प्रबंध, संशोधन महत्त्वपूर्ण ठरले. परळीतील अनेक शैक्षणिक संस्था उभारणीत प्राचार्य परळीकर यांचा मोलाचा वाटा होता. त्यांच्या निधनाने परिवारासह शैक्षणिक वर्तुळात मोठा धक्का बसला आहे. परळीकर- गव्हाणे कुटुंबियांच्या दुःखात दृष्टीकोन न्यूज.परिवार सहभागी आहे.  No comments