Breaking News

भाकरी देणाऱ्या गावात जिंदगीचा दवाखाना जिथे नाही मोबाईलला रेंज तिथे जीओची सिरींज

बीड : कोरोनाच्या काळात आरोग्याला आव्हान होते तसे माणुसकीची परीक्षा देखील ,आणि या परीक्षेत जीओ जिंदगी मोहीम दुसऱ्यांदा सिद्ध होत आहे , सामाजिक परिघातील समाजसेवी वृत्तींनी एकत्र येऊन जीओ ने जिंदगी वाचवण्याचे ब्रीद स्वीकारले , पहिल्या लाटेत गावाकडून भाकरी शहराकडे वाहून नेणाऱ्या जीओ ने दुसऱ्या लाटेत शहराकडून गावाकडे आरोग्य वाहून नेण्याची उतराई केली आहे . भाकरी देणाऱ्या गावात जीओ चा मोफत दवाखाना पोहचत आहे . दुर्दम्य व जिथे मोबाईल ला रेंज नाही अश्या डोंगर पट्ट्यात जीओ जिंदगीचे दवाखाने पोहचत आहेत , ग्रामीण जनतेला निशुल्क उपचार व आधार देताना कोरोना संदर्भात आवश्यक माहिती देण्याचे काम हे दवाखाने करत आहेत . डॉ सचिन घोरड यांनी निर्मळवाडी हिवरापहाडी दामोधरवाडी सतवाडी कारळवाडी या गावात मोफत सेवा दिली यावेळी मार्गदर्शक भास्कर ढवळे , संतोष ढाकणे व संपर्क समन्वयक धनंजय गुंदेकर , आर्यन फाउंडेशनचे राम फाळके  आदींची उपस्थिती होती . 


बीड जिल्ह्यातील कोरोना संकटात काम करणाऱ्या सेवाभावी संस्था व व्यक्तीचा एक मोठा जठ्ठा लोकसेवा करत आहे . जीओ जिंदगी कडून ग्रामीण भागातील लोकांच्या आरोग्यासासाठी मोठी मोहीम उघडली आहे . निशुल्क दवाखाने चालू केल्या नंतर आता दवाखाना थेट दारात घेऊन जाणारी मोहीम सुरु केली आहे , खेड्याकडे चला म्हणत भाकरी वाला दवाखाना गावागावात पोहचत असल्याचे चित्र आहे , राम फाळके यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधत जीओ ने काल या मोहिमेचा श्रीगणेशा केला . या मोहिमेमुळे शहर व गाव दरम्यान ची दरी कमी होणार असून यामुळे कोरोना संकटात गरजेची जागृती देखील ग्रामीण भागात होणार आहे . संपूर्ण उपचार मोफत व तोही दारात देण्याची शक्कल जीओ कडून  लढवली . यावेळी गावकरी जनतेतून प्रचंड समाधान व्यक्त करण्यात आले यावेळी लोकांना प्रशासनाच्या योजना व नियम देखील समजावून सांगण्यात आले.

हि वेळ सेवेची - डॉ सचिन घोरड 

कोरोणाचा काल अनेकांनी व्यवसाय साठी संधी म्हणून साधला असेल मात्र आपल्या लोकांची सेवा करण्याची संधी देखील आम्हाला साधता आली पाहिजे , माझा खाजगी दवाखाना बंद करून जीओ च्या मोहिमेत सहभागी होऊन गरिबांची सेवा करता आली त्यांना आधार देता यासाठी समाधान व्यक्त करण्यात आले . माझे गुरु भास्कर ढवळे सर , ढाकणे सर , वर्गमित्र धनंजय यांनी केलेले आवाहन माझ्यासाठी संधी ठरले असे सचिन घोरड यांनी म्हटले. No comments