Breaking News

माजी.आ.भीमसेन धोंडे व युवा नेते अजय धोंडे यांचा शिरुर दौरा


कोविड केंद्रावरील रुग्णांची मा.आ.भीमसेन धोंडे यांनी भेट घेऊन केली फळे वाटप

आष्टी :  कोरोना आजारापेक्षा भीतीने अनेक लोक त्रस्त असल्याचे समोर येत असताना आज दि.२६ रोजी आष्टी विधानसभेचे भाजपाचे जेष्ठ नेते मा.आ.भीमसेन धोंडे व भाजपा युवा मोर्चाचे जिल्हा सरचिटणीस अजय दादा धोंडे यांनी शिरुर कासार येथील कोविड केंद्रावर जाऊन थेट रुग्णांची भेट घेऊन विचारपूस करत रुग्ण व नातेवाईकांचे मनोबल वाढवण्याचे काम करत कोविड केंद्रावरील रुग्ण व नातेवाईकांना फळे वाटप केली.

         कोरोना महामारीत अनेक ठिकाणी कोरोना बाधित रुग्णांना कोणी भेटायला जायला धजत नाही. घरातील रक्ताचे नातेवाईक देखील केवळ फोनवर विचारपूस करताना दिसतात ज्यामुळे अनेक रुग्ण मानसिक तनावात असल्याचे जाणवत आहे. आज मात्र आष्टी विधासभेचे भाजपाचे जेष्ठ नेते मा.आ.भीमसेन धोंडे व भाजपा युवा मोर्चाचे जिल्हा सरचिटणीस अजय दादा धोंडे यांनी शिरुर कासार शहरातील ज्ञानसुधा हाॅस्पिटल व कोविड केअर केंद्र, शासकीय कोविड केंद्र  येथे भेट देऊन प्रत्यक्ष कोरोना बाधित रुग्णांची भेट घेत विचारपूस करुन फळे वाटप केली.

         शिरुर कासार शहरातील स्व.गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठान, शांतीवन संस्था व महारोगी सेवा समिती आनंदवन संयुक्त विद्यमाने संचालित मिशन आनंद सहयोग कोविड केंद्र येथे जि.प.सदस्य रामराव खेडकर व जि.प.सदस्य रामदास बडे यांच्या वतीने व मा.आ.भीमसेन धोंडे यांच्या हस्ते रेफ्रिजरेटर (फ्रिज) भेट देण्यात आले. तर रुग्णांना अजय दादा धोंडे यांच्या हस्ते फळे वाटप करण्यात आली. यावेळी मा.आ.भीमसेन धोंडे यांनी आरोग्य अधिकारी, कर्मचारी यांच्यासह रुग्णांचे नातेवाईक व कार्यकर्ते यांच्याशी देखील संवाद साधला.

          तसेच अल्पशा आजाराने निधन पावलेले ग्रामसेवक अतिष बर्वे, आत्महत्या केलेला तरुण व्यवसायिक अजिनाथ गायके व दोन दिवसांपूर्वी निर्घृण हत्या झालेले शहरातील प्रसिद्ध सराफा व्यावसायिक विशाल कुलथे या सर्वांच्या घरी जाऊन कुटुंबियांची भेट घेऊन मा.आ.भीमसेन धोंडे व अजय दादा धोंडे यांनी सांत्वन केले. यावेळी जि.प.सदास्य रामराव खेडकर, जि.प.सदस्य रामदास बडे, बाबुराव केदार, छगन आण्णा तरटे, युवा नेते किशोर खोले, एम.एन.बडे, अजिनाथ गवळी, ढाकणे तात्या, माऊली पानसंबळ, संजय शिरसाठ, महारुद्र खेडकर, देविदास गरकळ, सरपंच शिलाताई आघाव, सरपंच भागवत वारे सर व इतर उपस्थित होते. No comments