Breaking News

…याचं उदाहरण देशातील सर्वच पक्षांसाठी ममता दिदींनी दाखवून दिलं -रोहित पवार


मुंबई : हिंसा आणि आरोपांचं टोक गाठणाऱ्या पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीचं चित्र जवळपास स्पष्ट झालं आहे. पश्चिम बंगालमध्ये मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी पुन्हा एकदा आपलं वर्चस्व सिद्ध केलं आहे. तर दुसरीकडे संपूर्ण ताकद पणाला लावूनही भाजला शंभर जागाही मिळवता आल्या नसल्याचं स्पष्ट झालं आहे. या मोठ्या विजयाबद्दल ममता बॅनर्जी यांचं अभिनंदन होत असून, राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनीही पश्चिम बंगाल निवडणूक निकालावर प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.

पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेस सलग तिसऱ्यांदा सत्तेवर येणार असल्याचं स्पष्ट झालं आहे. शक्तिशाली भाजपाला धोबीपछाड देत तृणमूल काँग्रेसने जोरदार मुसंडी मारली आहे. बंगालमध्ये तृणमूल काँग्रेस २०० पेक्षा जास्त जागा जिंकत असल्याचं दिसत असून, भाजपा शंभरीच्या आतच दम तोडताना दिसत आहे. या निकालावर आमदार रोहित पवार यांनी ट्विट करत प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. “समोर कितीही बलाढ्य शक्ती असली, तरी त्यांच्याशी लोकांच्या साथीने त्याच आक्रमकपणे लढा दिल्यास त्यांनाही पराभूत करता येतं, याचं उदाहरण देशातील सर्वच पक्षांसाठी ममता बॅनर्जी दिदींनी दाखवून दिलं. या विराट विजयाबद्दल पश्चिम बंगालच्या जनतेचं आणि ममता दिदींचं मनःपूर्वक अभिनंदन!,” असं रोहित पवार यांनी म्हटलं आहे.

No comments