Breaking News

कितीही मोठी आपत्ती आली तरी आरोग्य सुविधा कमी पडू देणार नाही-ना. धनंजय मुंडे


आ. बाळासाहेब आजबे यांच्या मार्गदर्शनाखालील  आधार कोविड सेंटर चे उदघाटन संपन्न  

आष्टी : कोरोना ची दुसरी लाट रोखण्यासाठी बीड जिल्हा यशस्वी ठरला असून या जिल्ह्यासाठी आरोग्य सुविधा कमी पडू देणार नाही अशी ग्वाही जिल्ह्याचे पालकमंत्री तथा समाज कल्याण मंत्री ना. धनंजय मुंडे यांनी आष्टी येथील आमदार बाळासाहेब आजबे यांच्या मार्गदर्शनाखाली आधार कोव्हिड केंद्र च्या उद्घाटनाप्रसंगी केली.

 आॅक्सिजनची निर्मिती जिल्ह्यातच केली जाणार असून यापुढील १ महिन्यात बाहेरून आॅक्सिजन मागवण्याची गरज भासणार नाही. दुसरी लाट रोखण्यास बीड जिल्ह्याला यश आले आहे. यापुढे कितीही मोठी आपत्ती आली तरी आरोग्य सुविधा देण्यास कमी पडणार नाहीत अशी ग्वाही पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी दिली. ते अॅड.बी.डी.हंबर्डे महाविद्यालयातील आधार कोविड सेंटरच्या उद्घाटनप्रसंगी बोलत होते. 

आ. बाळासाहेब आजबे यांच्या मार्गदर्शनाखाली आष्टी येथील बी.डी. हंबर्डे कॉलेज येथे आधार कोविड सेंटर सुरु करण्यात आले आहे. केंद्राचे  उद्घाटन आज सकाळी १० वाजता पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्या हस्ते  करण्यात आले. उपमुख्यमंत्री अजित पवार उद्घाटनास ऑनलाईन माध्यमातून उपस्थित होते. यावेळी मुंडे म्हणाले की, आपत्तीजनक परिस्थिती उद्भवू नये यासाठी आम्ही सर्वोतपरी प्रयत्न करतोय. कोरोनाची तिसरी लाट येण्याची शक्यता आहे . यासाठी सर्वांनी खबरदारी घ्यावी असे आवाहन मुंडे यांनी केले. तर आ. रोहित पवार यांनी येथील कोविड सेंटर व आष्टी मतदारसंघाच्या मदतीसाठी सदैव तत्पर राहिल असे आश्वासन दिले.काल  आ . बाळासाहेब काका आजबे यांच्या पुढाकारातून उभारलेल्या 50 बेडच्या आधार कोविड केअर सेंटर चे उद्घाटन ना.धनंजय मुंडे  यांच्या हस्ते करण्यात आले . 

यावेळी व्यासपीठावर आ. रोहित पवार, आ. संदीप  क्षिरसागर, आ.बाळासाहेब आजबे, आ. यशवंत माने, माजी आ. साहेबराव दरेकर, माजी आ. अमरसिंह पंडित, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष बजरंग सोनवणे, युवा प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख, रामकृष्ण बांगर , भाऊसाहेब लटपटे, जिल्हा परिषद माजी अध्यक्ष शिवाजी राऊत, जि‌‌. प. सदस्य सतीश शिंदे आदींची उपस्थिती होती. तसेच किशोर हंबर्डे, शिरीष थोरवे, परमेश्वर शेळके, मनोज चौधरी, अण्णासाहेब चौधरी, रा. कां. पा अल्पसंख्यांक सेलचे तालुका अध्यक्ष शौकत पठाण,  दिगांबर पोकळे, बाबासाहेब वाघुले, सरपंच अशोक पोकळे,नाजिम शेख आदी उपस्थित होते.No comments