Breaking News

म्युकरमायकोसीस आजारावर जिल्हा रूग्णालयातच उपचार मिळावेत स्पेशल वार्ड कार्यान्वित करा; रूग्ण संख्या कमी होत असली तरी गाफील राहू नका


आ.संदिप भैय्या क्षीरसागरांनी जिल्हा रूग्णालयात जावून घेतला आढावा

बीड :  कोरोना रूग्णांची संख्या कमी होत असली तरी आरोग्य यंत्रणेने गाफील राहू नये. पुढील काळात कोव्हिडचा संसर्ग वाढू नये यासाठी सर्वांनी एकजुटीने स्वयंशिस्तीने काम करण्याची गरज आहे. कोरोनातून बरे झालेल्या रूग्णांमध्ये म्युकरमायकोसीस हा आजार आढळून येत असून या रूग्णांना जिल्हा रूग्णालयात उपचार मिळावे यासाठी स्पेशल वॉर्ड कार्यान्वित करा, लहान मुलांवर कोरोना उपचार संदर्भातही विशेष यंत्रणा कार्यान्वित करण्याच्या सूचना आ.संदिप भैय्या क्षीरसागर यांनी दिल्या आहेत. 
बीडच्या जिल्हा रूग्णालयात जावून आ.संदिप भैय्या क्षीरसागर यांनी कोरोना परिस्थिती व म्युकरमायकोसीस या आजाराबाबत आढावा घेतला. यावेळी त्यांच्या समवेत जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.गित्ते, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ.राठोड, डॉ.हुबेकर, डॉ.आंधळकर, अजय सुरवसे यांच्यासह आदी जण उपस्थित होते. आ.संदिप भैय्यांनी कोरोना वार्डात जावून पाहणी केली तसेच लहान मुलांसाठी न्यु लेबर आयसीयु 2 आणि मदर वार्ड, एनआरसी वॉर्डाची पाहणी केली. या पाहणीनंतर कोरोना रूग्णांची संख्या कमी होत असली तरी आरोग्य यंत्रणेने गाफील राहू नये, योग्य ती खबरदारी घ्यावी असे सांगत नागरीकांनीही आरोग्य यंत्रणेला सहकार्य करावं, शासनाने दिलेल्या निर्बंधाचे पालन करावे असे आवाहनही त्यांनी यावेळी जनतेला केले आहे.


No comments