Breaking News

शेत नांगरण्याच्या कारणावरून महिलेचा विनयभंग


ॲट्रॉसिटीची तक्रार दाखल करताच त्याच्या विरुद्ध विनयभंग आणि मौल्यवान वस्तू काढून घेण्याची तक्रार !

 गौतम बचुटे । केज 

केज तालुक्यातील मस्साजोग येथे वादग्रस्त जमीन नांगरण्याच्या कारणा वरून एका महिलेचा विनयभंग करीत तिच्या गळ्यातील मंगळसूत्र काढून घेत तिच्या नवऱ्याच्या पैसे काढून घेतल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या बाबतची माहिती अशी की, दि. २७ एप्रिल रोजी  सायंकाळी ५:०० वा. च्या दरम्यान केज तालुक्यातील मस्साजोग शिवारात एका न्यायप्रविष्ठ प्रकरणातील वादग्रस्त जमीन नांगरीत असताना २७ वर्षीय विवाहितेस तीन ओळखीचे आरोपी व तिघे अनोळखी यांनी तुम्ही हे शेत नांगरु नका तुमचा या शेतीशी काही संबंध नाही. असे म्हणून अशोक भगवान सोनवणे याने तिचा विनयभंग केला. तसेच तिच्या नवऱ्याच्या खिशातील १२ हजार रु. काढून घेतले आणि तिच्या गळ्यातील १८ हजार रु. किंमतीचे सोन्याचे मंगळसूत्र काढून घेतले. तसेच त्यांना मारहाण केली व जीवे मारण्याची धमकी दिली. अशा आशयाची तक्रार पीडित महिलेने दि.२ मे रोजी केज पोलीस ठाण्यात दिली आहे. त्या नुसार भगवान मेसू सोनवणे, अशोक भगवान सोनवणे, अमरदिप भगवान सोनवणे आणि तीन अनोळखी यांच्या विरुद्ध गु. र. नं. २२१/२०२१ भा. दं. वि. ३५४, ३५४ (अ) (१), १४३, ३२७, ३२३ व ५०६ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याचा तपास पोलीस निरीक्षक प्रदीप त्रिभुवन हे करीत आहेत.

दरम्यान याच प्रकरणी अशोक सोनवणे यांनी दि. २८एप्रिल रोजी केज पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे की, मस्साजोग येथे दि. २८ एप्रिल मंगळवार रोजी पहाटे ५:०० वा. च्या सुमारास अशोक भगवान सोनवणे यांच्या शेतातील तुरीचे भुस्कट नारायण सखाराम धस, परमेश्वर नारायण धस, आशोक नारायण धस, वैजनाथ भागवत धस, रामेश्वर भागवत धस हे सर्व रा. सांगवी ता. केज यांनी संगनमत करून जाळून नुकसान केले. या विषयी अशोक सोनवणे यांनी त्यांना विचारले असता उलट त्यालाच जातीवाचक शिवीगाळ करून मारहाण केली. तसेच त्याच्या घरी जाऊन कुटुंबीयांना काठीने मारहाण करून जीवे मारण्याच्या धमक्या दिल्या. या प्रकरणी अशोक भगवान सोनवणे यांच्या तक्रारी वरून नारायण सखाराम धस, परमेश्वर नारायण धस, आशोक नारायण धस, वैजनाथ भागवत धस, रामेश्वर भागवत धस सर्व रा. सांगवी ता. केज यांच्या विरुद्ध केज पोलीस ठाण्यात दि. २८ एप्रिल रोजी अनुसूचित जाती जमाती प्रतिबंधक कायदा (ॲट्रॉसिटी) सह साथ रोग प्रतिबंधक कायदा, मारहाण करून जीवे मारण्याची धमकी दिली. 

या प्रकरणी गु. र. नं. २१२/२०२१ भा. दं. वि. ४२७, १४३, १४७, १४९, ३२३,५०६ आणि अ.जा.ज. प्र. कायदा कलम ३ (१) (आर) (एस) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याचा तपास उपविभागीय पोलिस अधिकारी भास्कर सावंत हे करीत आहेत. या  दोन वेगवेगळ्या तक्रारी या एकमेकांच्या विरुद्ध असून एकाने ॲट्रॉसिटीची तक्रार दाखल करताच त्याच्या विरुद्ध विनयभंग आणि मौल्यवान वस्तू काढून घेणे अशी गंभीर तक्रार दाखल केली आहे. 

No comments