Breaking News

सराफा हत्याप्रकरणातील आरोपीच्या मामाची आत्महत्या

शिरूर कासार : शिरूर कासार येथील सराफा हत्या प्रकरणातील आरोपीच्या मामाने आत्महत्या केल्याची घटना काल रात्री घडली आहे. आत्महत्येचे कारण अद्याप स्पष्ट झाले नसून पुढील तपास पोलिस करत आहेत. 

चार दिवसापूर्वी शिरूर कासार येथील सलून मध्ये सराफा व्यापाऱ्याची हत्या घडल्याची घटना घडली होती. या घटनेतील फरार आरोपीचा मामा आदिनाथ धोंडीराम गायके (वय 25) याने काल रात्री शिरूर येथील सलूनच्या दुकानात फाशी घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली. रात्री साडेनऊच्या नंतर या घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी पंचनामा केला. 

आज सकाळी शवविच्छेदनानंतर पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. या प्रकरणी शिरूर कासार पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद घेण्यात आली असून पुढील तपास पोलिस निरीक्षक सिद्धार्थ माने यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस जमादार के.एम. काझी करत आहेत.

No comments