Breaking News

राजमाता अहिल्याबाई होळकर जयंती निमित्त मा.आ.भीमसेन धोंडे यांनी केले प्रतिमेचे पुजन


आष्टी : राजमाता पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर चौक आष्टी येथे राजमाता अहिल्याबाई होळकर यांच्या २९६ व्या जयंती निमित्त मा.आ.भीमसेन धोंडे यांनी प्रतिमेचे पुजन केले. अहिल्याबाई होळकर यांचा जन्म ज्या चौंडी गावात झाला ते पूर्वी आष्टी तालुक्यात होते. बीड जिल्ह्यातून परराज्यात जाऊन इंदोर या ठिकाणी उत्कृष्ठ राज्यकारभार करुन आपल्या कार्याची वेगळी ओळख निर्माण केली. अहिल्याबाई होळकर यांनी स्वतः घोड सवारी करुन अनेक महिलांना त्यांनी प्रेरित करून सक्षम केले. असे मनोगत मा.आ.भीमसेन धोंडे यांनी व्यक्त केले.

        राजमाता अहिल्याबाई होळकर प्रतिमेचे पूजन करताना यावेळी बीड जि.प.माजी अध्यक्ष डॉ.शिवाजी राऊत, अमोल तरटे, पं.स.सदस्य संदिप आस्वर, कडा कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी उपसभापती ढवण, अरुण सायकड, पत्रकार उत्तम बोडखे, संतोष दाणी, राजेंद्र लाड, राजेंद्र गोल्हार व इतर मान्यवर उपस्थित होते.


No comments