Breaking News

शेतकऱ्यांना बांधावर बी-बियाणे व औषधे कृषी सहाय्यक यांच्या माध्यमातुन द्या-ॲड.सदानंद वाघमारे.


बीड :  गेल्या दोन वर्षापासून संसर्गजन्य आजार कोरोना मुळे शेतकरी हवालदिल झालेला आहे अनेक समस्यांना तोंड देत असून त्यांची आर्थिक बाजू कमकुवत झालेली आहे कृषी सहाय्यकाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना बांधावर बी बियाणे व आवश्यक औषधोपचार फवारणी देण्याची मागणी ॲड.सदानंद वाघमारे यांनी केली आहे. लॉकडाउनच्या काळामध्ये शेतकरी आर्थिक दृष्ट्या कमकुवत झाला असून त्याच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. 

अशा परिस्थितीमध्ये शेतीमधील कामे करणे अतिशय बिकट झालेली आहे याची शासनाने प्रशासनाने दखल घेणे आवश्यक आहे शेतकऱ्यांच्या समस्या जाणून शासन प्रशासनाने त्यांना तात्काळ मदत करणे आवश्यक आहे जेणेकरून येणाऱ्या काळात शेतकरी आपल्या शेतामध्ये पिके घेऊ शकतील. पडत्या काळामध्ये शेतकऱ्यांना सावरून घेण्याचे काम प्रशासनाने करावे. जगाचा पोशिंदा त्याला हातभार लावणे प्रशासनाचे आद्यकर्तव्य असून त्यांनी तात्काळ शेतकऱ्यांना बांधावर जाऊन खते बी-बियाणे व औषध फवारणी चे साहित्य तात्काळ देण्यात यावी अन्यथा शेतकऱ्यांच्या न्याय हक्काच्या मागणीसाठी रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही असे ही या वेळी ॲड. सदानंद वाघमारे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळवले आहे. 

No comments