Breaking News

अवकाळी पावसाचा फटका : अंबाजोगाईच्या बाजारपेठ मधून गावरान आंबा गायब

शिवाजी भोसले । अंबाजोगाई 

अंबाजोगाई तालुक्यामध्ये गावरान आंब्याची मोठ्या प्रमाणामध्ये विक्री व्हायची पण कोरोणाच्या प्रादुर्भावामुळे व अवकाळी पावसाच्या फटक्यामुळे गावरान आंबा बाजारपेठे मधून गायब झालेला आहे.

 कैऱ्यापासून ते पाडा पर्यंत येणाऱ्या आंब्याला निसर्गाच्या अवकृपेने यावर्षी फटका बसला त्यामुळे सद्यस्थितीत बाजारपेठेतून गावरान अंबा गायब झाल्याचे चित्र अंबाजोगाई व परीसरात दिसून येत आहे अक्षय तृतीयेच्या जवळपास वेगवेगळ्या जातीचे अंबे विक्रीसाठी दाखल होतात कोरोना कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे जनजीवन विस्कळीत झाले असले तरी फळ व भाजीपाला विक्री शासन आदेशाप्रमाणे खुल्या बाजारात चालू आहे शहराचे तापमान कधी वाढते कधी कमी होते पण बाजारात आंब्याला मागणी वाढत असते या वर्षीही तशीच आहे रासायनिक पद्धतीने पिकविण्यात येणाऱ्या फळांना नागरिक नाकारत असल्याने घरगुती गावरान फळाला मागणी वाढली आहे.

वेगवेगळ्या जातीचे आंबे बाहेर घेऊन येणार असल्याने त्यास सद्यस्थितीत पसंती मिळेलच असे नाही त्यातच गारपीट अवकाळी पावसामुळे गावरान अंबा दुर्मिळ झाला आहे रमजान महिन्यातही गावरान आंबा दुर्मिळ होता आता देखील तो दुर्मिळच आहे रमजान महिन्यापासून विविध फळांना तसेच आंब्याला चांगली मागणी असते अंबाजोगाईच्या बाजारपेठेत सध्या लंगडा, बदाम पायरी, नीलम, तोतापुरी, हापुस आदीसह अनेक जातीचे आंबे विक्रीसाठी उपलब्ध आहेत परंतु गावरान आंबा बाजारात सध्या दिसत नाही त्यातच आंब्याचे दर १०० रुपयांपासून ते दोनशे रुपयांपर्यंत जाऊन पोहोचले असल्याने खाणाऱ्यांचा हिरमोड झाला असून विशेषतः बच्चे कंपनी घरातच असल्याने त्यांना अंब्यांची चव चाखता येईनाशी झाली आहे.


No comments