Breaking News

स्व.गोपीनाथ मुंडे साहेबांनी आपलं आयुष्य सर्वसामान्यांच्या भल्यासाठीच घातले : मा.आ.भीमसेन धोंडे


आष्टी येथे युवा नेते अजय दादा धोंडे यांच्या हस्ते रक्तदान शिबीराचे उदघाटन संपन्न

आष्टी : स्व.गोपीनाथराव मुंडे पुण्यतिथी व कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मा.आ.भीमसेन धोंडे यांच्या आवाहनानुसार युवा नेते अजय दादा धोंडे यांच्या नेतृत्वाखाली भगवान महाविद्यालय आष्टी येथे आज दि.३० मे रोजी रक्तदान शिबिराचे उदघाटन अजय दादा धोंडे यांच्या हस्ते संपन्न झाले. यावेळी मा.आ.भीमसेन धोंडे यांनी रक्तदान शिबिराला भेट देऊन रक्तदाते व कार्यकर्त्यांशी संवाद साधला. कोरोनाची परिस्थिती गंभीर असून, यात बाधीत झालेल्या रूग्णांना रक्तसाठा शिल्लक नसल्याने खुप मोठ्या अडचणी येत आहेत. ज्यांनी आपलं आयुष्य सर्वसामान्य लोकांसाठी घातले असे स्व.गोपीनाथ मुंडे यांच्या पुण्यतिथी निमित्त आष्टी येथे रक्तदान शिबीर आयोजित करून खऱ्या अर्थाने स्व.गोपीनाथ मुंडे यांना अभिवादन केले असल्याचे प्रतिपादन मा.आ.भीमसेन धोंडे यांनी केले.

             आष्टी येथे आज रविवार दि.३० रोजी स्व.गोपीनाथ मुंडे यांच्या पुण्यतिथीचे औचित्य साधून भगवान महाविद्यालयात रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. या रक्तदान शिबीराचे उदघाटन भाजपा युवा मोर्चाचे जिल्हा सरचिटणीस अजय दादा धोंडे यांनी केले. तर भाजपाचे जेष्ठ नेते मा.आ.भीमसेन धोंडे यांनी रक्तदान शिबिराला भेट देऊन रक्तदाते व कार्यकर्ते यांच्याशी संवाद साधला. 

तसेच यावेळी उदघाटन प्रसंगी प्रथम रक्तदान करणारे भाजपा युवा मोर्चाचे तालुका उपाध्यक्ष ऋषिकेश काळे यांना मा.आ.धोंडे यांच्या हस्ते प्रमाणपत्र देखील देण्यात आले. आजच्या या रक्तदान शिबिराला चांगला प्रतिसाद देत १०४ रक्तदात्यांनी रक्तदान केले आहे, तर पुढे बोलतांना मा.आ.धोंडे म्हणाले, ज्या नेत्याने आपले उभे आयुष्य फक्त सर्वसामान्यांच्या भल्यासाठी घालून कायम संघर्षातच राहिले आहे. सध्या कोरोनाच्या महामारीमुळे राज्यात ऑक्सीजन व रक्ताचा तुटवडा असून, ब-याच रूग्णांचा रक्ताअभावी मृृृृत्यू होत असल्याचेही समोर आले आहे. आज जरी आपल्यात स्व.मुंडे साहेब नसले तरी त्यांच्या पुण्यतिथीच्या निमित्तानेही ते सर्वसामान्यांच्या कामी येत आहेत. आम्ही आष्टी तालुक्यात आज रक्तदान शिबीर आयोजित करून स्व.मुंडे साहेबांना श्रध्दाजंली अर्पण केली असल्याचेही त्यांनी सांगितले.

         रक्तदान शिबिर उदघाटन प्रसंगी युवा नेते अभयराजे धोंडे, मा.सरपंच संतोष भैय्या चव्हाण, प्राचार्य डॉ.दत्तात्रय वाघ, प्राचार्य डॉ.हरिदास विधाते, महाराष्ट्र केसरी सईद चाऊस, पञकार उत्तम बोडखे, सरपंच प्रा.राम बोडखे, भाजपाचे तालुकाउपाध्यक्ष रघूनाथ शिंदे, युवा मोर्चाचे तालुका उपाध्यक्ष ऋषीकेश काळे, प्रा.डॉ.मुश्ताक पानसरे, प्रा.डॉ.विनोद ढोबळे, प्रा.डॉ.शाम सांगळे, अस्ताक शेख, अज्जूभाई शेख, अहमदनगर ब्लडबॅकचे डाॅ.राजेंद्र पवार, शिवम खिलारे, सोनिया शितोळे, सुप्रिया कपीले, प्रतिक्षा घावटे हे उपस्थित होते.No comments