Breaking News

आ.सुरेश धस यांच्या हस्ते शेतकऱ्यांना मोफत चारा बियाणे वाटप


आष्टी : एकीकडे कोरोना महामारी व त्यात सर्व बाजारपेठा बंद तसेच लॉकडाऊन असल्याने दूध व्यवसाय खूप अडचणीत आला आहे.३० रुपये प्रति लिटर मिळणारा भाव २० भाव झाल्याने दूध व्यवसाय करणारा शेतकरी अडचणीत आला आहे. कोरोना काळात शेतकऱ्यांना मदत व्हावी व दिलासा यासाठी राष्ट्रीय डेअरी विकास बोर्ड (एनडीडीबी) यांच्या मार्फत आष्टी तालुका दूध उत्पादक व पुरवठा सहकारी संघ मर्या.आष्टी या संघास १६.५ क्विंटल मका, कडवळ व बाजरी चारा पिकाचे बियाणे उपलब्ध झालेले आहे. आष्टी तालुका दूध संघामध्ये सदर चारा बियाणे वाटप शुभारंभ आ. सुरेश धस यांच्या हस्ते करण्यात आला. 

आष्टी तालुका दूध संघामार्फत २५० शेतकऱ्यांना मका, कडवळ व बाजरी या चारा पिकाचे बियाणे दूध संघाचे दूध पुरवठा करणाऱ्या संस्थेमार्फत करण्यात आले. या कार्यक्रम वेळी दूध संघाचे चेअरमन संजय गाढवे, व्हा. चेअरमन आत्माराम फुंदे, पत्रकार उत्तम बोडखे, कार्यकारी संचालक मच्छिंद्र धनवडे, मोहन झांबरे, चंद्रकांत भोसले तसेच संघास दूध पुरवठा करणारी संस्था प्रतिनिधी व शेतकरी उपस्थित होते.


No comments