Breaking News

मच्छिंद्रनाथ देवस्थानच्या कोवीड सेंटरला आ.सुरेश धस मिञ मंडळाच्या वतीने एक लक्ष रुपये देणगी

के. के. निकाळजे । आष्टी

 मच्छिद्रनाथ देवस्थान सावरगाव यांच्या वतीने आ. सुरेश धस यांच्या मार्गदर्शनाखाली सुरु असलेल्या  सावरगाव येथील कोव्हीड सेंटरला आष्टी तालुक्यातील घाटा (पिंप्री) येथील आ.सुरेश धस मित्र मंडळाच्या वतीने १ लक्ष १ हजार रुपये देणगी म्हणून तहसिलदार राजाभाऊ कदम,ना.तहसिलदार प्रदिप पांडूळे यांच्या उपस्थितीत देवस्थानचे अध्यक्ष दादासाहेब चितळे यांच्याकडे सुपुर्द करण्यात आली.

आष्टी,पाटोदा,शिरुर तालुक्यामध्ये मच्छिद्रनाथ देवस्थान सावरगावच्या वतीने कोरोनाग्रस्त रुग्णांसाठी कोवीड सेंटरची उभारणी करण्यात आलेली आहे.या ठिकाणी सुरु असलेली आरोग्यसेवा आणि मोफत जेवनाची व्यवस्था यातून अनेक गोरगरीब रुग्णांची सोय होत आहे.याच पार्श्वभूमीवर आ.सुरेश धस यांच्या मार्गदर्शनाखाली सुरु असलेल्या या कोवीड सेंटरच्या सोयी सुविधा आणि मच्छिंद्रनाथ गडाचे योगदान याचा एक भाग म्हणून आष्टी तालुक्यातील घाटा (पिंप्री)येथील आ.सुरेश धस मिञ मंडळाच्या वतीने १ लक्ष १ हजार रुपये देणगी स्वरुपात देण्यात आले.यावेळी आष्टीचे तहसिलदार राजाभाऊ कदम,ना.तहसिलदार प्रदिप पांडूळे,मच्छीद्रनाथ देवस्थानचे अध्यक्ष दादासाहेब चितळे,तलाठी शरद शिंदे आदी उपस्थित होते.No comments