Breaking News

प्रस्थापितांना धडा शिकवून विस्थापित मराठा समाजाला न्याय मिळवून देण्याचे काम फक्त आ.विनायकराव मेटेच करू शकतात - लक्ष्मण ढवळे


बीड : आज सुप्रीम कोर्टाने मराठा आरक्षण रद्द केले त्याला सर्वस्वी जबाबदार  55 वर्ष राज्यात आणि केंद्रात सत्तेचा उपभोग घेणारे शरद पवार हेच कारणीभूत आहेत. एवढी दिर्घकाळ सत्तेत राहूनही शरद पवार यांनी कधीच विस्थापित मराठा समाजातील होतकरू, हुशार सर्व गुण संपन्न अस्या  गरीबांना न्याय मिळवून देण्या साठी सत्तेचा वापर केला नाही, उलट विस्थापित गरीब मराठा गरीबच राहीला पाहीजे असे राजकारण केले. विस्थापित मराठा समाजाला आरक्षण मिळवून देण्या साठी त्यांना त्यांचे न्याय व हक्क मिळवून देण्या साठी सर्व शक्ति निशी ओबीसी समाजाला विश्वासात घेऊन लढा देणारे आमदार विनायकराव मेटे यांनाच जातीयवादी म्हणून बदनाम करण्याचे षडयंत्र आपल्या बगलबच्च्या कडून पद्धतशीर पणे करून बहुजन समाजा मध्ये केले आहे. 
परंतू आता बहुजन समाज एवढा दूधखूळा राहीला नाही शत्रू आणि मीत्र याची ओळख आता बहुजन समाजाला झाली आहे. तमाम विस्थापित मराठा समाज बांधवांनो तुम्हाला तूमचे हक्क आणि न्याय मिळवून देण्यासाठी फक्त आणि फक्त आमदार विनायकराव मेटेच लढा देऊ शकतात आणि विस्थापित मराठा समाज बांधवानो तुम्हाला तूमचे अधिकार हवे असतील तर सर्व हेवे दावे सोडून आमदार विनायकराव मेटे यांना खंबीर पणे साथ देऊन त्यांनी सूरू केलेल्या आंदोलनात तन मन धनाने सहभागी व्हावे  विनायकराव मेटे शिवाय मराठा समाजासाठी कोणीही मराठा नेता तुमच्यासाठी रस्त्यावर उतरून आंदोलन करणार नाहीत, असे लक्ष्मण ढवळे म्हणाले.

No comments