Breaking News

केजच्या मोंढ्यातून एकाचे इंडिका गाडीतून अपहरण

गौतम बचुटे । केज 

केज येथील मोंढ्यातून एका ३० वर्षीय तरुणाचे इंडिका गाडीतून अपहरण केल्याची घटना घडली असून या प्रकरणी आठजणा विरुद्ध अपहरण व मारहाणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

या बाबतची अधिक माहिती अशी की, केज येथील मंगळवार पेठेतील टेलर गल्लीत राहणारे बालाजी कल्याण सुरवसे हे चहाचे दुकान व मिस्त्री काम करीत आहेत. दि. २१ एप्रिल रोजी बालाजी कल्याण मुंडे यांना उज्वल उर्फ दादा मुंडे रा भायाजळी यांनी तू पैसे का देत नाहीस? असे म्हणून व त्याच्या सोबतच्या इतरांनी संगनमत करून इंडिगो गाडीतुन क्र. (एम एच-४४/जी-९५२) भायजळी येथे शेतात घेऊन गेले. तिथे गेल्या नंतर बालाजी सुरवसे यास उज्ज्वल उर्फ दादा मुंडे आणि त्यांच्या साथीदारांनी काठीने आणि लोखंडी रोडने डोक्यात, तोंडावर, हातावर, पायावर, पोटावर व पाठीवर मारहाण करून दुखापत केली. तसेच डोंगरावर नेऊन ढकलून दिले आणि शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिली.

या प्रकरणी दि. १३ मे रोजी बालाजी सुरवसे यांनी केज पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. बालाजी सुरवसे यांच्या तक्रारी वरून या प्रकरणी उज्वल उर्फ दादा मुंडे आणि इतर अशा एकूण आठ जणांच्या विरुद्ध अपहरण करणे, मारहाण करून जीवे मारण्याची धमकी देणे व जीवितास हानी पोहोचविणे या आरोपा वरून गु. र. नं. २३६/२०२१ भा. दं. वि. ३६५, ३२३, ३२४, ५०४, ५०६ व ३३६ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक प्रदीप त्रिभुवन यांच्या मार्गदर्शनाखाली महिला पोलीस कर्मचारी आशा चौरे या पुढील तपास करीत आहेत. 


No comments