Breaking News

अमरसिंह पंडित यांच्या वाढदिवसानिमित्त पिंपळनेर जि.प.गटातील २२ गावांचे निर्जंतुकीकरण करणार पिंपळनेर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा उपक्रम


गेवराई ः राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस अमरसिंह पंडित यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने पिंपळनेर जिल्हा परिषद गटातील २२ गावांमध्ये सोडियम हायपोक्लोराईडची फवारणी करून निर्जंतुकीकरण करण्याचा उपक्रम राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीतर्फे राबविण्यात येत आहे. सोमवार, दि.३१ रोजी सकाळी पिंपळनेर पासून या उपक्रमास सुरुवात होणार असल्याची माहिती राष्ट्रवादी किसान सेलचे जिल्हाध्यक्ष सुनिल पाटील यांनी दिली. ग्रामीण भागातील कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी हा समाजोपयोगी उपक्रम राबविण्यात येत असल्याचे त्यांनी यावेळी सांगितलेे. या उपक्रमात पिंपळनेर जिल्हा परिषद गटातील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सर्व कार्यकर्ते व पदाधिकारी सहभागी होत आहेत.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश सरचिटणीस तथा माजी आ.अमरसिंह पंडित यांनी कोरोनाच्या महामारी काळात समाजोपयोगी उपक्रम राबवून गोरगरीबांना धीर देण्याचे मोठे काम केले आहे. बड जिल्ह्यात पहिल्यांदा त्यांनी २०० खाटांचे कोविड केअर सेंटर उभारले. त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने कोरोनाचा ग्रामीण भागातील फैलाव रोखण्याच्या दृष्टीने पिंपळनेर जिल्हा परिषद गटातील सर्व गावांचे निर्जंतुकीकरण करण्याचा स्तुत्य उपक्रम राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने हाती घेतला आहे. पिंपळनेर जिल्हा परिषद गटातील २२ गावांमध्ये सोडियम हायपोक्लोराईडची फवारणी वाढदिवसाच्या औचित्याने करून सर्व गावे निर्जंतुक करण्याचा प्रयत्न यानिमित्ताने होणार आहे.
पिंपळनेर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे पदाधिकारी बळवंत चव्हाण, उध्दव पैठणे, पं.स.सदस्य किशोर सुरवसे, दत्ता पाटील, प्रमोद माने, प्रशांत माने, प्रभाकर माने, श्रीकृष्ण कदम, रामकृष्ण आबुज, सरपंच रमेश नागरगोजे, भगवान देवडकर, सरपंच वशिष्ट कुटे, दामोधर चव्हाण, प्रदिप चव्हाण, अशोक कवचट, हनुमान दुबाले, सतिष महाराज, दत्ता दुबाले, राम जाधव, लक्ष्मण करांडे, प्रदिप घुमरे, अजय मते, रामतिर्थ मते, नानाभाऊ लोणकर, बाळू कानडे, नंदू मोरे, ओम हातोटे, गणेश वरकड यांच्यासह आदी पदाधिकारी हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेत आहेत.No comments