Breaking News

घरी सोडतो असे सांगून दुचाकीवर नेलेल्या महिलेचा विनयभंग एकावर विनयभंग, ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल

गौतम बचुटे । केज 

घराकडे निघालेल्या ३५ वर्षीय महिलेस घराकडे सोडतो असे सांगून दुचाकीवर बसवून नेत विनयभंग करीत काठीने मारहाण केल्याची घटना युसुफवडगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली. याप्रकरणी एकाविरुद्ध ॲट्रॉसिटी व विनयभंगचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

पीडित ३५ वर्षीय विवाहित महिला ही पोट दुखत असल्याने ७ मे रोजी सकाळी ९.३० वाजता मेडिकलहुन गोळ्या घेण्यासाठी गावाकडून रिक्षाने बनसारोळा येथे आली होती. गोळ्या घेतल्यानंतर परत घराकडे चालत निघाली होती. याचवेळी आरोपी बंडू इब्राहिम पठाण ( रा. बनसारोळा ) हा पाठीमागून आला. तुम्हाला घरी सोडतो अशी गप मारून त्याने पीडित महिलेला दुचाकीवर बसविले. 

दुचाकी घराकडे न नेता बोरीसावरगाव येथील तळ्याकडे घेऊन गेला. इकडे कुठे आणले अशी विचारणा करीत महिला गाडीवरून उतरली. बंडू पठाण याने पीडित महिलेच्या हाताला आणि साडीला ओढत विनयभंग केला. पीडित महिला घाबरून पळू लागली असता बंडू याने पीडित महिलेच्या हातावर काठीने मारले. त्यामुळे पीडित महिला चक्कर खाली पडलेली पाहून आरोपी बंडू पठाण तेथून पळून गेला. ११ मे रोजी दिलेल्या पीडित महिलेने दिलेल्या फिर्यादीवरून बंडू पठाण याच्याविरुध्द युसुफवडगाव पोलिसात ॲट्रॉसिटी व विनयभंगचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. केजचे उपविभागीय पोलीस अधिकारी भास्कर सावंत व जमादार संजय राठोड हे पुढील तपास करत आहेत.

No comments