Breaking News

सरपंचाच्या व्हाट्अप तक्रारीची आगार व्यवस्थापकांनी घेतली तात्काळ दखल

साळेगावचे बस स्टँड पाडल्या प्रकरणी तिघांवर गुन्हा दाखल

गावकरी आक्रमक : पोलीसांना भेटून केली कठोर कार्यवाहीची मागणी

गौतम बचुटे । केज

सरपंचाने पाठविलेल्या व्हाट्सअप्प तक्रारीची दखल रा .प .म. च्या धारूर आगारच्या आगार व्यवस्थापकांनी घेत प्रवाशी निवाऱ्याचे शेड पाडल्या प्रकरणी थेट पोलीसात गुन्हा दाखल केला आहे.

केज तालुक्यातील साळेगाव येथे महामार्गा वरील मुख्य रस्ता हद्दीत प्रवाशांसाठी सार्वजनिक बांधकाम विभागाने बस स्टँड (प्रवाशी निवारा) दि. २३ मे रविवार रोजी रात्री ९:३० ते १०:०० वा. च्या दरम्यान अज्ञात इसमाने जेसीबी मशीनच्या सहाय्याने रात्री अंधाराचा फायदा घेऊन जेसीबी मशीनच्या साहाय्याने पाडून नासधूस केली केली होती. या प्रकरणी घटनेची सरपंच कैलास जाधव यांनी विभागीय वाहतूक व्यवस्थापक आणि रा.प.म. धारूर आगाराचे व्यवस्थापक स्वामी यांच्याकडे व्हाट्सअप्प द्वारे केली होती. त्याची आगार व्यवस्थापक स्वामी यांनी तातडीने दखल घेत दि. २४ मे रोजी वाहतूक निरीक्षक राठोड यांना पहाणी करून कार्यवाही करण्याचे आदेश दिले.

त्या नुसार वाहतूक निरीक्षक राठोड यांचे सोबत बिक्कड व घोळवे यांनी घटनास्थळी जाऊन पहाणी केली. त्या नंतर केज पोलीस स्टेशनला हजर होत बस स्टँडचे निवारा शेड पाडल्या प्रकरणी फेरोज पटेल, सय्यद अलिपाशा रसूल  आणि सय्यद जमिलपाशा रसूल या तिघांच्या विरुद्ध गु. र. नं. २६५/२०२१ नुसार सार्वजनिक मालमत्ता विरुपणास प्रतिबंधक कायदा १९९५ चे कलम ३ आणि भा. दं. वि. ४२७ व ३४ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी पोलीस निरीक्षक प्रदीप त्रिभुवन यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक अमोल गायकवाड हे पुढील तपास करीत आहेत.

ते जेसीबी कुणाचे ? 

बस स्टँड पाडण्यासाठी संशयित आरोपींनी भाड्याने लावलेले जेसीबी मशीन कुणाचे? याचा शोध पोलीस घेत असून आरोपींना ताब्यात घेतल्या नंतर त्याचा तपास लागण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

बस स्टँड पाडल्या प्रकरणी गावकरी आक्रमक 

बस स्टँड पाडल्यामुळे गावकरी आक्रमक झाले असून सरपंच कैलास जाधव, उपसरपंच अमर मुळे आणि माजी सरपंच नारायण लांडगे यांच्यासह सुमारे २० ते २५ जणांनी पोलीस निरीक्षक प्रदीप त्रिभुवन यांना भेटून कठोर कार्यवाहीची मागणी केली आहे.


No comments