Breaking News

सालेवडगाव - लोणीत आ. बाळासाहेब आजबे यांच्या हस्ते कोवीड सेंटरचे उद्घाटन


कोविड रुग्णांना ग्रामीण भागातच उपचार मिळण्यासाठी आवश्यक तेथे कोविड सेंटर उभारणार : आ. बाळासाहेब आजबे

के.  के. निकाळजे । आष्टी

कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी व नागरीकांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी कोविड रुग्णांना गावात वेळेवर प्राथमिक उपचार मिळण्यासाठी आ. बाळासाहेब आजबे मित्र मंडळ व स्थानिक स्वयंसेवी संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने शासन मान्य कोविड केअर सेंटर सालेवडगाव व लोणी सय्यदमीर याठिकाणी सुरू करण्यात आले असून  या भागातील कोविड रुग्णांनी या ठिकाणी डॉक्टरांच्या सल्याने  उपचार घ्यावेत. या ठिकाणी सर्व सेवा सुविधा देण्यासाठी मी स्वतः लक्ष ठेऊन आहे, सुरुवातीलाच कोविड रुग्णांना प्राथमिक उपचार तात्काळ मिळाल्यास रुग्णांची पुढील गंभीर परिस्थिती  टळू शकते त्यामुळे आपण आवश्यक तेथे ग्रामीण भागात यापुढेही कोविड सेंटरची उभारणी करणार असल्याचे  आ. बाळासाहेब आजबे  यांनी सालेवडगाव व लोणी येथे शासन मान्य कोविड सेंटरचा शुभारंभप्रसंगी बोलतांना सांगितले .


                    आष्टी मतदारसंघाचे आ बाळासाहेब आजबे यांनी कोरोना परीस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी व रुग्णांना आरोग्य सुविधा शासन स्तरावर व वैयक्तिक पातळीवर मिळवून देण्यासाठी कंबर कसली असून त्याचाच एक भाग म्हणून आ बाळासाहेब आजबे मित्र मंडळाच्या वतीने स्थानिक कार्यकर्ते व स्वयंसेवी संस्थाना सोबत घेऊन शासन मान्य कोविड केअर सेंटर उभारणी करण्याचे काम सुरू आहे सालेवडगाव ता आष्टी येथे सरपंच महादेव डोके यांच्या रामतीर्थ सेवाभावी संस्थेने तर लोणी सय्यदमीर येथे कल्पतरू फाउंडेशनने कोविड केअर सेंटर सुरू केले आहे .आ बाळासाहेब आजबे यांच्या हस्ते या दोनही सेंटरचे उद्घाटन करण्यात आले आहे या दोन्ही सेंटरमध्ये ग्रामीण भागातील जवळपास वीस गावातील नागरीकांची सोय होणार आहे या दोन्ही ठिकाणी कोविड केअर सेंटर सुरू झाल्याने या भागातील नागरीकांनी आ आजबे व स्थानिक कार्यकर्ते यांना धन्यवाद दिले आहेत.

     उद्घाटन प्रसंगी आ बाळासाहेब आजबे ह भ प स्वामी महाराज राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अण्णासाहेब चौधरी ,माजी जि प अध्यक्ष,डॉ शिवाजी राऊत,काकासाहेब शिंदे, कृषी भूषण बाबासाहेब पिसोरे आंभोरा पोलीस ठाण्याचे ए पी आय ज्ञानेश्वर कुकलारे तालुका आरोग्य अधिकारी डॉ नितीन मोरे डॉ आरंबे डॉ वाघ माजी जि प सदस्य शिवाजी डोके नवनाथ तांदळे , प स सदस्य संदिप आस्वर ,कर्तव्य प्रतिष्ठानचे अध्यक्ष  संदीप सुंबरे , सरपंच अशोक पोकळे ,नाजिम शेख सुभाष वाळके, अर्जुन काकडे, बाबा भिटे, महादेव अमृते  बाबासाहेब निंबाळकर डॉक्टर धीटे रिंकू बेलेकर संतोष वाळके बाबा वाघुले, तुकाराम धांडे महादेव अमृत गणेश पोकळे चंद्रकांत खलासे योगेश शेळके महादेव जगताप दत्ता काकडे नीळकंठ सुंबरे कुंडलीक रक्ताटे .सरपंच एकनाथ वाणी रावसाहेब दळवी गोटीराम कोहोक संदिप अस्वर संदीप सुंबरे पत्रकार शरद तळेकर अंकुश तळेकर अमर हजारे शेख कासम आदिनाथ फसले मोहन तळेकर संपत झेंडे भास्कर थोरात शाम फसले गोवर्धन ठोंबरे आरुण शेळके बाबासाहेब ठोंबरे आशोक हजारे प्रा अनिल हजारे संदीप रामगुडे सचिन डोके यांच्यासह ग्रामस्थ आरोग्य अधिकारी कर्मचारी उपस्थित होते सर्वाचे स्वागत आणि आभार सरपंच महादेव डोके यांनी मानले तसेच या परीसरातील रुग्णांनी लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे. 

No comments