Breaking News

बीड येथील हॉटेल व्यवसायिक गडगीळे कुटुंबीयांनी निवारा बालगृहास केली अन्नधान्य व किराणाची मदत

बीड :  येथील हॉटेल व्यावसायिक अतुल गडगीळे यांनी निवारा बालगृहास शनिवारी (दि.२२) सदिच्छा भेट दिली. यावेळी त्यांनी तेथील चिमुकल्यांसाठी  एक महिन्याचा अन्नधान्य व किराणा, सामान दिले तसेच याप्रसंगी सॅनिटायझर व  मास्कचे ही वाटप करण्यात आले.

          ग्रामीण विकास केंद्र संचलित निवारा बालगृह मोहा फाटा (समता भुमी) ता- जामखेड जि- अहमदनगर या ठिकाणी अनाथ, निराधार, वंचित, लोककलावंत, वीटभट्टी कामगार, ऊसतोड मजूर, भटके-विमुक्त, आदिवासी घटकातील 65 मुला मुलींच्या शिक्षणासाठी हे बालगृह चालवले जात असून या बालगृहाला शासनाची कोणतीही मदत मिळत नाही हे बालगृह संपूर्णपणे लोकवर्गणीतून चालवले जात आहे.

     


     बीड येथील हॉटेल व्यवसायिक अतुल गडगीळे यांनी या अनाथ निराधाराची तळमळ जाणून  स्वतःचा  इतर ठिकाणी होणारा खर्च टाळून तो अनाथ, निराधारांना एक महिन्याचा अन्नधान्य व किराणा व बालगृहातील मुलांना कोरोणा महामारी पासून बचाव होण्यासाठी सॅनिटायझर मास्क देण्यात आला,

       अतुल गडगीळे बोलताना म्हणाले की शिका संघटित व्हा  आणि संघर्ष करा व जामखेड तालुक्यामध्ये देखील अनाथांचा बाप जन्माला आला आहे, तो म्हणजे अॅड. डॉ.अरुण जाधव यांच्या मुळेच गोरगरीब कष्टकरी अनाथ निराधार मुलांना पाटी आणि पेन्सिल ची ओळख निर्माण झाले आहे या बालगृहाच्या वाटचालीस भरभरून शुभेच्छा दिल्या व या अनाथांसाठी तुम्हाला ज्या वेळेस गरज भासेल त्यावेळेस अन्नधान्य व कीराण्याची मदत केली जाईल, त्यावेळी प्रमुख पाहुण्यांचे बालगृहातील मुलांनी स्वागत गीत गाऊन स्वागत केले, व आलेल्या पाहुण्यांचे शाल व संस्थेचे माहिती पुस्तिका देऊन सत्कार करण्यात आला. 

 संस्थेची  संपूर्ण माहिती संस्थेचे संस्थापक ॲड.डॉ. अरुण जाधव यांनी दिली प्रास्ताविक संतोष चव्हाण सर यांनी केले, यावेळी गडगीळे कुटुंबातील प्रमुख व्यक्ती भानुदास गडगीळे राहुल गडगीळे,कौशल्य गडगीळे, नितीन गडगीळे,सविता गडगीळे, भाग्यश्री गडगीळे नम्रता गडगीळे श्रद्धा गडगीळे, समिक्षा,साईदीप निवारा बालगृहाचे अधीक्षक वैजीनाथ केसकर, संगीता केसकर, सविता शिंदे व विद्यार्थी उपस्थित होते.No comments