Breaking News

रमजान ईद मुस्लिम बांधवांनी अत्यंत साधेपणाने साजरा करावी - मुफ्ती अब्दुल वाजिदअशरफी

बीड  : गेल्या दीड वर्षापासून आपल्या भारत देशासह जगभरात कोरोना विषाणू या महामारी ने थैमान घातलेला असून आत्तापर्यंत लाखो लोकांनी या महामारीत आपले जीव गमावले आहे . या महामारीच्या सुरुवातीपासून लाॅकडाउन सदृश्य परिस्थितीमुळे सर्व व्यापार ठप्प आहेत मजुरांच्या हाती काम नाही, गरिबांचे जेवणासाठी हाल होत आहे .अशा परिस्थितीत मुस्लिम बांधवांनी नेहमीच लोकांच्या कामी येण्याची व सहकार्य करण्याची परंपरा अबाधित ठेवली आहे . यावर्षी रमजान ईद येत्या 13 किंवा 14 मे रोजी आपल्या देशात साजरी होणार आहे राज्यभरात राज्य शासनाने कडक निर्बंध लावलेले आहेत तसेच बीड जिल्ह्यात मा. जिल्हाधिकारी यांनी लॉकडाउन जाहीर केलेला आहे. 

सर्व दुकाने बाजारपेठ बंद असून प्रशासनामार्फत लोकांना घरी राहण्याविषयी व कोरोना विषाणुवर नियंत्रण करण्यासाठी शासनाने निर्गमित केलेल्या विविध आदेशांची अंमलबजावणी करण्याविषयी सूचना देण्यात येत आहे तरी सर्व मुस्लिम बांधवांनी गेल्या वर्षी सारखा यावर्षी सुद्धा रमजान ईद आपल्या घरीच राहून अत्यंत साधेपणाने साजरा करावी व ईदची नमाज आपल्या घरीच अदा करावी तसेच लॉकडाउनमुळे गोर गरीब लोकांचे अत्यंत हाल होत असून या लोकांना मदत करावी त्यांचे व त्यांच्या कुटुंबाची आर्थिक मदत करावी तसेच कोणीही कोणत्याही धर्माचा समाजाचा एक ही माणूस उपाशी राहू नये यासाठी सर्वांनी गोरगरीब लोकांमध्ये किराणा वस्तू जीवनावश्यक वस्तू वाटप करावे व अशा परिस्थितीत सुध्दा सर्वांची ही ईद गोड करण्याचे प्रयत्न करावे असे आवाहन हयात ग्रुप बीड़ चे अध्यक्ष मुफ्ती अब्दुल वाजिद अशरफी यांनी केली आहे. 

No comments