Breaking News

मराठा क्रांती संघर्ष मोर्च्यात हजारोच्या संख्येने सामील व्हावे - नितीन आगवान

 


बीड :  आरक्षणापासून वंचित असलेल्या मराठा समाजातील मुला-मुलींना न्याय मिळवून देण्यासाठी गेली 30 वर्ष लढा देत असणारे शिवसंग्राम संस्थापक अध्यक्ष आ विनायकराव मेटे साहेब यांच्या नेतृत्वाखाली निघत असलेल्या बीड येथील 5 जुन रोजीच्या मराठा क्रांती संघर्ष मोर्च्यात हजारोच्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन शिवसंग्राम युवा नेते नितीन आगवान यांनी केले आहे.
गेल्या तीन दशकापासून मराठा आरक्षण प्रश्नी व समाजाच्या विविध मागण्या घेऊन आदरणीय आमदार विनायकराव मेटे साहेब शिवसंग्राम च्या माध्यमातून लढत आहेत याच बरोबर मराठा समाजातील मुलांना व्यवसाय करण्यासाठी आर्थिक विकास महामंडळ स्थापन करण्यासाठी तात्कालिक सरकारच्या विरोधात आंदोलने,मोर्चे काढले व कै आण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडाळची स्थापना झाली मात्र आरक्षनाचा प्रश्न प्रलंबित राहिला,2014 च्या विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर आघाडी सरकारने आरक्षण दिले व नंतर तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांच्या सरकारने ते आरक्षण हायकोर्टात टिकवले पण दुर्दैवाने काही मराठा आरक्षण विरोधी मंडळीनी पुढे सुप्रीम कोर्टात आरक्षण विरोधी याचिका दाखल केली मात्र सद्यस्थितीतील आघाडी सरकारने पाहिजे तेव्हडी आरक्षनाची बाजु मांडली नाही व दुर्दैवाने सुप्रीम कोर्टाने मराठा आरक्षणाला स्थगिती दिली या मुळे मराठा समाजातील मुलांचे शिक्षण व नौकरीचे अतोनात नुकसान होणार आहे या करिता मराठा आरक्षण मिळे पर्यंत हा आरक्षण लढा कायम राहील, तरी मराठा आरक्षण विषयी आस्था आसनाऱ्यानिं येत्या 5 जुन 2021 रोजी सकाळी 11:00 वा छत्रपती शिवाजी महाराज क्रिडा संकुल ते जिल्हाधिकारी कार्यालय बीड येथे निघणाऱ्या मराठा क्रांती संघर्ष मोर्च्यात हजारोच्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन शिवसंग्राम युवा नेते नितीन आगवान यांनी केले आहे.

No comments