Breaking News

सामाजिक बांधीलकी जोपासत अमरसिंह पंडित यांचा वाढदिवस कार्यकर्त्यांनी केला साजरा


गेवराई :  अमरसिंह पंडित यांनी कोरोनाच्या परिस्थितीत सामाजिक बांधिलकी जोपासत अनेक कामे उभारली. वाढदिवसाच्या निमित्ताने कार्यकर्त्यांनीही असे सामाजिक कार्यक्रम घ्यावेत, सार्वजनिक कार्यक्रम घेऊ नका, गर्दी टाळा आणि नियम पाळा असे आवाहन केले होते. त्याला प्रतिसाद देत आज कार्यकर्त्यांनी माजी आमदार अमरसिंह पंडित यांचा  वाढदिवस गेवराई तालुक्यात समाजोपयोगी उपक्रम राबवून मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासनाच्या सर्व नियमांचे पालन करुन वाढदिवस साजरा करण्यात आला. वाढदिवसाच्या निमित्ताने अमरसिंह पंडित आणि शिवछत्रवर हितचिंतकांनी सोशल मिडियाच्या माध्यमातून शुभेच्छांचा वर्षाव केला.अमरसिंह पंडित यांच्या वाढदिवसानिमित्त राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष गुफरान इनामदार व त्यांच्या सहकाऱ्यांनी शहरातील गरीब १०० कुटुंबांना अन्न धान्य किटचे वाटप केले. यावेळी बाजार समितीचे सभापती जगन पाटील काळे, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष दिपक आतकरे, आवेज सेठ, सय्यद नजीब चाचू, दत्ता पिसाळ, संदिप मडके, अक्षय पवार, वसीम फारुकी आदींची उपस्थिती होती तर कोरबु गल्ली येथे नविद मशायक, शेख मोहसीन यांच्या वतीने गरिब कुटुंबियाना १०० किराणा किटचे वाटप करण्यात आले.
यावेळी नगरसेवक श्‍याम येवले, माजी नगरसेवक शेख खाजाभाई,  मोहंमद गौस, माजी नगरसेवक दादासाहेब घोडके, सय्यद एजाज, विलास निकम, बब्बू बारूदवाले, श्याम रुकर, इम्रान भाई आदी उपस्थित होते.


गेवराई तालुक्यात यमगरवाडी व बोकुडदरा तांडा येथे विशाल पांढरे व त्यांच्या सहकाऱ्यांनी ३० फोकस (मर्कुरी लाईट) स्वखर्चातून बसवले आणि  दोन्ही गावे प्रकाशमय झाले आहेत. यावेळी बळीराम चव्हाण, मच्छिंद्र चव्हाण, भाऊसाहेब चव्हाण, भाऊसाहेब लेंडाळ, प्रकाश चव्हाण, विठ्ठल राठोड, कोंडीराम चोरमले, जगन्नाथ यमगर, नवनाथ करे, नामदेव राठोड, नितिन राठोड, प्रविण चव्हाण सुनिल पवार आदी उपस्थित होते.


बीड येथील विजय चांदणे,महाराष्ट्र प्रदेश युवक अध्यक्ष क्रांतीगुरू लहुजी साळवे विकास परिषद यांनी व त्यांच्या सहकाऱ्यांनी खंडेश्वरी परिसरातील दिपमाळ येथे वृक्षारोपण केले. यावेळी के. के. वडमारे, सत्यनारायणजी ढाका, मुकेश शिवगन, नारायणराव लांडगे, बापु पवार, पवन खुपसे, अक्षय भैय्या सुरवसे, स्वप्निल धुंरधरे, लालु भैय्या, जय चांदणे आदी उपस्थित होते.

शारदा कोविड केअर  सेंटर येथे रुग्णांना जयभवानी शिक्षण प्रसारक मंडळाच्या वतीने फळांचे  वाटप माजी सभापती कुमारराव ढाकणे यांच्या हस्ते  करण्यात आले यावेळी गढीचे सरपंच अंकुशराव गायकवाड, रामदास मुंडे, डॉ. गवळी, मंगेश कांबळे,  प्रशासकीय अधिकारी प्रमोद गोरकर, प्राचार्य डॉ. विश्वासराव कदम, प्राचार्य राठोड व्ही. पी., डॉ. सय्यद मॅडम आदी मान्यवर उपस्थित होते


राष्ट्रवादी युवक चे शहर उपाध्यक्ष राहुल मोटे व राष्ट्रवादी काँग्रेस महिला आघाडीच्या शहाराध्यक्षा सौ. मुक्ता आर्दड यांनी शिवाजीनगर येथील कोविड सेंटर व गेवराई येथील महिला कोविड सेंटर येथे रूग्णांना नाष्टा व फळ वाटप केले.

शिवछत्र दुर्गा उत्सव समिती, छत्रपती संभाजीराजे मित्र मंडळाच्या माध्यमातून आनंद दाभाडे, बाळासाहेब दाभाडे, विशाल दाभाडे, रवी दाभाडे, आदित्य दाभाडे आदींच्या सहकार्याने गरजू कुटुंबाना जीवनावश्यक किराणा किटचे वाटप केले.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष दीपक आतकरे व दत्ता दाभाडे यांच्या हस्ते गैबिसहाब पीर बाबाला फुलांची चादर चढवून गरजूंना किटचे वाटप केले.
यावेळी विक्रम कदम, महादेव काशीद, संदीप मडके, अक्षय पवार, दत्ता पिसाळ, मोहसीन शेख, नाविद मशायक, अमोल वैद्य, विनोद पौळ, शेख जावेद सर आदींची उपस्थिती होती

पनवेल स्नेहल आधार गृह (वृद्धाश्रम) नेरेगांव येथे वृद्धांना नाष्टा व इतर साहित्य देऊन वाढदिवस साजरा केला. यावेळी पनवेल राष्ट्रवादी युवक अध्यक्ष दर्शन भाई ठाकुर, पनवेल कृषी उत्त्पन्न बाजार समिती चे संचालक संतोष पाटिल, संजय घाडगे, उमेश फाटक, विशाल औटि, साहिल पाटिल उपस्थित होते.

उमापूर येथे सुभाष काळे यांच्या मार्गदर्शनाखाली दत्ताभाऊ पिसाळ यांच्या वतीने गरजू व्यक्तींना किराणा किट वाटप करण्यात आले. यावेळी उपस्थित अंगद माने, संदीप मडके, सचिन गोचीडे, राज पिसाळ, सुनिल पिसाळ, गोकुळ चोरमले उपस्थित होते. 

शारदा विद्या मंदिर येथे मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. या वेळी नगरसेवक शाम काका येवले, विलास निकम, माजी नगरसेवक विठ्ठल पवार, बाबू बेदरे, दिनेश घोडके, अनिस भाई, संदीप मडके, प्राचार्य जगदाळे, काशिनाथ गोगुले आदी उपस्थित होते. 
No comments