Breaking News

पं.स.सभापती बालाजी मुंडे यांनी घेतला लसिकरणाचा आढावा

ना.धनंजय मुंडेंच्या माध्यमातुन आवश्यक तो लस पुरवठा करु-मुंडे 

परळी वैजनाथ :  शहरासह तालुक्यातील लसिकरण केंद्रावर लस उपलब्ध करुन देण्यात आली असुन येणार्या काळात सर्व नागरीकांचे लसिकरण पुर्ण होण्यासाठी पालकमंत्री ना.धनंजय मुंडे साहेबांच्या माध्यमातुन आवश्यक तो लसींचा साठा उपलब्ध करु असे पंचायत समितीचे सभापती बालाजी (पिंटु) मुंडे यांनी सांगितले. शहरातील एका व तालुक्यातील पाच केंद्रावरील लसिकरण केंद्रांना भेटी देवुन आढावा घेतला त्याप्रसंगी ते बोलत होते.

   सध्या उपलब्ध असलेल्या लसींमधून ज्या नागरिकांना पहिला डोस देऊन विहित वेळ पूर्ण झाली आहे, त्यांना दुसरा डोस वेळेत देणे आवश्यक असल्याने  परळी तालुक्यातील  नटराज रंगमंदिर व  प्रा आ केंद्र मोहा, प्रा आ केंद्र पोहनेर , प्रा आ केंद्र सिरसाळा प्रा आ केंद्र धर्मापुरी, प्रा आ केंद्र नागापूर  येथील लसीकरण केंद्रावर 45 वर्षांवरील दुसऱ्या डोस साठी पात्र असलेल्या नागरिकांसाठी दुसरा डोस उपलब्ध करुन देण्यात आला. शुक्रवारी दि.14 मे रोजी सभापती बालाजी मुंडे यांनी शहरातील एका व तालुक्यातील पाच केंद्रावरील लसिकरण केंद्रास भेट दिली.

परळी तालुक्यातुन आतापर्यंत आरोग्य केंद्रातील लसिकरण केंद्र आतापर्यंत पहिला व दुसरा डोस 35 हजार नागरीकांना लस देण्यात आली आहे.सुरुवातीस कोरोनावरील लसिबाबत जागृती नसल्याने नागरीकांचा लस घेण्यास तेवढा प्रतिसाद नव्हता.आता लसिकरणासाठी नागरीक गर्दी करत असल्याने केंद्र व राज्य सरकारकडुन जिल्ह्याचे पालकमंत्री ना.धनंजय मुंडे साहेबांच्या माध्यमातुन लसींचा आवश्यक तो साठा उपलब्ध करु असे बालाजी मुंडे यांनी सांगितले. लसीकरण केंद्रावर भेट देऊन आढावा घेतला तसेच प्रत्येक केंद्रावर नागरिकांना सुरळीत लस देण्यात यावी असे नियोजन करण्यात आले होते.  यावेळी गटविकास अधिकारी संजय केंद्रे, नागापूर प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. विकास मोराळे, सिरसाळा प्राथमिक आरोग्य केंद्रातील डॉ. दिशा मुंडे व इतर आरोग्य कर्मचारी उपस्थित होते.


No comments