Breaking News

एकसंघ भारताचे पोकळ पांडित्य

नुकतेच सरसंघचालक मोहन भागवत यांनी नवी दिल्ली व्याख्यानमालेत कोरोणा आणि एकसंघ भारत यावर आपले मत प्रतिपादित केले. यात भागवत म्हणाले कि, जगभरात  करोनाच्या संकटाविषयी त्यांनी स्पष्ट भूमिका मांडली. “पहिली लाट आल्यानंतर आपण सगळे काहीसे गाफील झालो. म्हणून हे संकट उभं राहिलं. असा दावा करत त्यांनी सरकार गाफील असल्याचे एका दृष्टीने मान्य केले. पण या काळात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी देशवासीयांना दिवे लावण्याचे केलेले आवाहन आणि टाळ्या- थाळ्या वाजवायला लावल्याचा कृतिकार्यक्रम सांगितलं नाही. याचाच अर्थ असा कि, मोदी सरकारचे कोरोना काळातील अपयश मोहन भागवत लपवत आहेत. त्यापुढे जाऊन भागवत असेही म्हणाले कि,  आता तिसऱ्या लाटेची चर्चा सुरू झाली आहे. पण तिला न घाबरता तिला परत फिरावं लागेल अशी तयारी आपल्याला करायला हवी” पण ती करायची कशी? गोमूत्र पिऊन, अंगाला लावून कि अजून कसे याचे स्पष्टीकरण त्यांनी नीट केले नाही. त्यामुळे त्यांचे हे व्याख्यान गबाळग्रंथी झाले हे त्रिवार सत्य कोणासही काबूलच करावे लागेल.

भेदभाव विसरून एकसंघ लढा द्यावा लागेल

आपल्यातील अंतर्गत भेदभाव विसरून एकत्र येऊन या संकटाशी लढा द्यावा लागेल, असं यावेळी मोहन भागवत म्हणाले. पण इथे भेदभाव आलाच कसा? याबद्दल मोहन भागवत बोलले नाहीत. म्हणजे, तोंडात एक आणि कामात मेख असाच हा प्रकार. भारतात अस्थित्वात असलेली जातव्यवस्था हि वर्णाश्रमातून आलेली असून ती विषमतावादी आहे. त्यामुळे भारतात प्रत्येक जात विषमतावादी असून त्याला धर्मव्यवस्था जबाबदार आहे. आणि, वर्णव्यवस्था, धर्मव्यवस्था, जातव्यवस्था हि मनूने सांगितलेली आहे. मग भेदभावाचा समूळ नाश करायचा झाल्यास मनूने सांगितलेल्या स्मृतींना काल्बाह्यया करायला नको का? दुसरी गोष्ट हि कि, भारतीय संविधानात भेदभाव पाळणे कायद्याने गुन्हा ठरविला आहे. तरीही भागवत म्हणतात कि, भेदभाव विसरून एकत्र यावे लागेल. मग प्रश्न का आहे कि, संघाच्या सामूहिक स्नेहभोजनाने आजपर्यंत भेदभावाचा प्रश्न निकालात का निघाला नाही?

वैज्ञानिकतेचा आधार घ्या

यावेळी मोहन भागवत यां सर्वांनीच वैज्ञानिकतेचा आधार घेण्याचं आवाहन केलं. कोणतीही चर्चा ही वैज्ञानिकतेच्या आधारावरच तपासून घेतली गेली पाहिजे, अशी भूमिका त्यांनी मांडली. “वैज्ञानिकतेचा आधार घेणं आवश्यक आहे. कुणी सांगतं म्हणून ते योग्य आहे किंवा एखादी गोष्ट नवीन आहे म्हणून ती योग्य आहे किंवा जुनी आहे म्हणून योग्य आहे असं माहितीच्या बाबत करू नका. जे काही तुमच्यापर्यंत येतंय, त्याचं वैज्ञानिकतेच्या आधारावर परीक्षण करूनच त्याचा स्वीकार करा. आपल्याकडून कोणतीही निराधार बाब समाजात जाऊ नये आणि आपणही अशा बाबीचं पालन करता कामा नये याची काळजी घ्यायला हवी. आयुर्वेदाच्या नावावर अनेक चर्चा अशा सुरू असतात. पण वैज्ञानिकतेच्या तर्कावर जोपर्यंत त्या गोष्टी सिद्ध होत नाहीत, तोपर्यंत अशा गोष्टींबाबत सावध राहणं आवश्यक आहे”, असं त्यांनी नमूद केलं. त्यांचे हे विधान योग्यच. पण संघाच्या इतर घटक संघटनेचे पदाधिकारी म्हणतात कि, ' माझ्या शेतातील आंबा खाल्याने मुलगा जन्माला येतो.' आता यावर भागवत काय बोलणार. किंबहुना:, सम तारखेस मुलगा आणि विषम तारखेस मुलगी जन्माला येते वगैरे. एकीकडे विज्ञानाची कास धरा म्हणणाऱ्या भागवतांची सर्व टीम अंधश्रद्धा पेरते त्याचे काय करायचे?

ही परिस्थिती आपल्यातले दोष दाखवेल

“काही लोकं घाबरून अनावश्यक रुग्णालयात दाखल होतात. परिणामी खरी गरज ज्यांना असते, त्यांना बेड मिळत नाही. त्यामुळे लक्षणं जाणवू लागताच डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि त्यानुसार लागलीच पावलं उचला उपचार सुरू करा. नियमांचं पालन करून आपण समाजसेवा केली, तर आपण पुढे जात राहू. असं भागवत म्हणाले. मग संघ नियमाचे पालन करतो का? राष्टीय ध्वजावर रा. स्व. संघाची निष्ठा आहे का? असेल तर संघाच्या मुख्यालयावर तिरंगा का फडकीला जात नाही? समताआधारित भारतीय संविधानाच्या जागी विषमताआधारीत मनुस्मृती लागू करा अशी मागणी संघ का करतो? भागवत खरेच देशभक्त आहेत तर ते संघाला कायद्याच्या कक्षेत का आणत नाहीत? हीच भागवतांची आणि संघी लोकांची देशभक्ती आहे एक? असे असेल तर भागवतांनी भारतीयांना एकसंघ भारताचे पोकळ पांडित्य शिकवू नये.

  विचारधारा...

- सुधाकर सोनवणे, बीड


No comments