Breaking News

विनायक निघाले जिल्ह्यावरील विघ्न हरण्यासाठी....


घरातून पत्रकबाजी करणाऱ्या नेत्यांपेक्षा कोविड सेंटरचा घाट घालणारे मेटे साहेब सरस : प्रशांत डोरले

बीड : देशासोबतच राज्यात ही कोरोना महामारीच्या दुसऱ्या लाटेने धुमाकूळ घातलेला आहे, यातून बीड जिल्हा ही अपवाद राहिलेला नाही. संपुर्ण जिल्हा हा अनिश्चित लॉकडाऊन च्या गर्तेत सापडलेला आहे, जिल्ह्यातील नागरिक बंद ने तर कोरोना रोगाच्या प्रादुर्भावामुळे त्रस्त झालेले आहेत. अश्या काळात बीड जिल्ह्यातील नेतेमंडळी हे पत्रकबाजी काढून जनतेची व रुग्णांच्या नातेवाईकांची दिशाभूल करत असताना शिवसंग्राम पक्षाचे अध्यक्ष तथा आमदार विनायकरावजी मेटे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसंग्राम हेल्थ लाईन च्या माध्यमातून रुग्णांना व रुग्णांच्या नातेवाईकांची होणारी हेळसांड कमी करण्यासाठी टीम कार्य करत आहे, तर स्वतः मेटे साहेब हे अधिकारी वर्गाच्या भेटी घेत त्यांना सूचना करत परिस्तिथी नियंत्रणात आणण्यासाठी प्रयत्न करत आहे, अश्या वेळी वाढती रुग्ण संख्या व अपुरी शासकीय यंत्रणा, यंत्रणेवर पडणारा वाढीव भार लक्षात घेता जिल्ह्यातील रुग्णांसाठी मेटे साहेब यांनी कोविड सेंटर चालू करण्याचा घातलेला घाट पाहता चतुर्थीच्या  मुहूर्तावर रुग्णांना विनायक पावला असे म्हणावे लागेल असे प्रतिपादन शिवसंग्राम युवक शहराध्यक्ष प्रशांत डोरले यांनी माध्यमांना पत्रकाद्वारे केले आहे.

या महामारीच्या काळात ही गेल्या दीड वर्षापासून आ. मेटे साहेब ह्यांच्या मार्गदर्शनाखाली टीम अविरतपणे लोकांना जमेल तशी मदत करत आहेत, घाबरून घरात न बसता ऑन फिल्ड काम सुरूच आहे. कोरोना ग्रस्तांच्या मदतीसाठी शिवसंग्राम ने साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आरोग्य हेल्पलाइन सुरू केली या हेल्पलाइनच्या माध्यमातून शेकडो कोरोनाग्रस्तांना बेड, जेवण, रक्त यांसारखी वैद्यकीय मदत करण्यात आलेली आहे. या सर्वांवर नियंत्रण ठेवत मार्गदर्शन सुरू असताना विनायकराव मेटे साहेब जिल्ह्यात सुरू असलेला रेमिडीसिव्हर इंजेक्शनच्या काळाबाजार प्रकरणांची माहिती जिल्हाधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिली तसेच जिल्हा शल्यचिकित्सक यांची भेट घेऊन रुग्णांची होणारी गैरसोय तर नातेवाईकांची होणारी हेळसांड सोबतच बेड, इंजेक्शन साठी होणारी धावपळ कमी करण्यासाठी काही मार्गदर्शक सूचना करण्याचे ही आदेश यावेळी दिले.

   एकीकडं प्रस्थापित मंडळी आपला परिवार आपली सुरक्षा हे धोरण राबवत घरातूनच पत्रकबाजी करत नातेवाईकांच्या भावनांचा चकणाचुर करत असताना कुठल्याही गोष्टीची पत्रकबाजी न करता जिल्ह्यात भव्य असे 200 खाटांचे कोविड केअर सेंटर सुरू करत जिल्ह्यातील नागरिकांवर आलेले विघ्न हरण्यासाठी नावाप्रमाणेच साक्षात विनायकाच्या रुपात आल्याचे भासत असल्याचे प्रतिपादन शिवसंग्राम युवक शहराध्यक्ष प्रशांत डोरले यांनी युवक आघाडी बीड शहराच्या वतीने केले आहे यावेळी शिवसंग्रामचे राहुल गायकवाड, अर्जुन यादव, ज्ञानेश्वर सालपे, अक्षय डोंगरे, सलमान शेख, कल्पक शिरभाते सह अन्य उपस्थित होते. 

No comments