Breaking News

गोपीनाथ मुंडे कोविड केअर सेंटर मधील रुग्णांना इंदूबाई गोल्हार यांनी दिला पौष्टिक आहार

बाळकृष्ण मंगरूळकर । शिरूर कासार

शिरूर येथील गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठा सिद्धेश्वर इंग्लिश स्कूल मध्ये सुरू असलेल्या कोरोना केअर सेंटर मधील उपचार घेणाऱ्या रूग्णांना  इंदूबाई गोल्हार यांच्या वतीने आठ दिवस पौष्टिक आहाराचे वाटप करण्यात येणार आहे.

त्याची सुरुवात गुरुवारी करण्यात आली  असून रुग्णांच्या शरीरात प्रोटिन्स आणि व्हिटामिन वाढीसाठी हा सकस आहार देण्यात येणार आहे.सध्या केंद्रात 80 रुग्ण उपचार घेत असून त्यांना मिळणारा उपचार आणि सकस आहार तसेच दैनंदिन दिनचर्या यामुळे रुग्णांना लवकर आराम मिळत आहे.माजी आमदार भीमसेन धोंडे यांच्या सूचनेवरून इंदूबाई गोल्हार यांचे चिरंजीव इंजि.संतोष गोल्हार यांनी रुग्णांना सात दिवस मांसाहार पुरविण्याची जबाबदारी घेतली आहे.त्याचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी विविध मान्यवर व कर्मचारी उपस्थित होते.


No comments