Breaking News

हॉटेल सुरू करण्यासाठी माहेरहून पैसे घेऊन ये म्हणून विवाहितेचा छळ विवाहितेने गळफास घेतल्या प्रकरणी नावऱ्यासह पाच जणांविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल

गौतम बचुटे । केज 

केज येथे हॉटेल सुरू करण्यासाठी माहेरहून पैसे घेऊन ये म्हणून छळ होत असल्याने विवाहितेने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी मयत विवाहितेच्या नवऱ्यासह सासरच्या पाच जणांच्या विरुद्ध केज पोलीस ठाण्यात आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

केज येथे दि. ११ मे रोजी रात्री १०:०० वा. च्या दरम्यान केज येथिल २२ वर्षीय विवाहिता राहत शहाबन कुरेशी हिने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. 

या प्रकरणी विवाहितेचे वडील मंजूर युनूस कुरेशी रा. मोहोळ जि. सोलापूर यांनी केज पोलीस स्टेशनला त्यांची मुलगी मयत राहत शहाबन कुरेशी हिला तिचा नवरा, सासरा, दिर, जाऊ व नणंद यांनी संगनमत करून मारहाण करून वारंवार शारीक व मानसिक छळ करून आत्महत्येस प्रवृत्त केल्या प्रकरणी तक्रार दिली. त्या नुसार मयत विवाहितेचा नवरा शहाबाज कदिरमियाँ कुरेशी, सासरा कदिरमियाँ कुरेशी, दिर आयफान कदिर मियाँ कुरेशी, जाऊ हिना आयफान कुरेशी व नणंद रिजवान मुजिब कुरेशी यांच्या विरुद्ध गु. र. नं. २३२/२०२१ भा. दं. वि. ३०६, ४९८ (अ), ३२३ व ३४ नुसार पोलीस उपनिरीक्षक दादासाहेब सिद्धे यांनी गुन्हा दाखल करून घेतला आहे. पोलीस निरीक्षक प्रदीप त्रिभुवन यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष मिसळे हे पुढील तपास करीत आहेत. 

No comments