Breaking News

नागसेन बुद्ध विहारामध्ये पप्पू कागदे यांच्या हस्ते पंचशील ध्वजवंदन

बीड : महाकारुणीक तथागत भगवान गौतम  बुद्ध यांच्या जयंतीनिमित्त येथील पालवन चौकातील नागसेन बुद्ध विहारमध्ये तथागत गौतम बुद्ध यांच्या मुर्तीची पूजा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे युवक प्रदेशाध्यक्ष पप्पू कागदे यांच्या हस्ते करण्यात येवून पंचशील ध्वजवंदन मंगळवारी (दि.२६) सकाळी करण्यात आले.


 वैशाखी पौर्णिमेला महाकारुणीक तथागत गौतम बुद्ध यांची जयंती देशभरात मोठ्या प्रमाणात साजरी केली जाते. मंगळवारी बीड जिल्ह्यात बुद्धिस्ट बांधवांनी कोरोना महामारीमुळे आप- आपल्या घरी गौतम बुद्ध यांच्या प्रतिमेचे पूजन करून पंचशील ध्वज घरावर फडकविला. तसेच बीड शहरातील पालवन चौकामध्ये असलेल्या नागसेन बौद्ध विहारात कोरोनाच्या नियमांचं पालन करून फिजिकल डीस्टंसिंग राखून बौद्ध जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे युवक प्रदेशाध्यक्ष पप्पू कागदे यांच्या हस्ते पंचशील ध्वजवंदन करून तथागत भगवान गौतम बुद्ध यांच्या मूर्तीचे पूजन करण्यात येवून सामुहिकरित्या त्रिशरण, पंचशील, बौद्ध वंदना घेण्यात आली. यावेळी नगरसेवक गणेश वाघमारे, नाना मस्के मिलिंद पोटभरे यांच्यासह बौद्ध उपासक उपासिका यांची उपस्थिती होती.  No comments