Breaking News

केज-कळंब हायवे वरील पेट्रोल पंपावर दिड लाख रुपयांच्या डिझेलची चोरी...!


पेट्रोल पंपाच्या टाकीचे झाकणाचे कुलूप तोडून डिझेल चोरी

गौतम बचुटे । केज 

 केज येथील कळंब रोडच्या भाजपाचे नेते रमेश आडसकर यांच्या मालकीच्या नवीन सुरू झालेल्या पेट्रोल पंपाच्या डिझेल टाकीच्या झाकणाचे कुलूप तोडून आतील दीड लाख रुपयाच्या डिझेलची चोरी झाली आहे.


या बाबतची माहिती अशी की, केज येथील केज-कळंब रोडवर कमल पेट्रोलियम या नावाने भाजपा नेते रमेश आडसकर साहेब यांचा एक महिन्यांपूर्वी पेट्रोल पंप सुरू झाला आहे. १ मे रोजी मध्यरात्री धुमारे १२:३० वा. च्या नंतर अज्ञात चोरांनी पेट्रोल पंपाच्या डिझेल टाकीचे कुलूप तोडून त्याला मोटार लावून त्यातील डिझेल खेचून कॅन मध्ये भरले.

 ते एका वाहनात ठेवत असताना पेट्रोल पंपावरच्या कर्मचाऱ्यांनी आरडाओरडा करताच अज्ञात चोरटे १ लाख ४९ हजार १६७ रु. किंमतीचे १७०० लिटर डिझेल प्लॅस्टिकच्या कॅन मध्ये भरून ते वाहनात ठेवून केजच्या दिशेने पसार झाले. या गडबडीत चोरट्यानी ४१ प्लॅस्टिक कॅन मध्ये काढून घेतलेले सुमारे १७०० लिटर डिझेल शेजारी शेतात ठेवले असल्याने ते मात्र वाचले. या बाबत पेट्रोल पंपाच्या मॅनेजरच्या तक्रारी वरून केज पोलीस ठाण्यात गु. र. नं. २१९/२०२१ भा. दं. वि. ३७९ व ३४ नुसार अज्ञात चोरट्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस निरीक्षक प्रदीप त्रिभुवन यांच्या मार्गदर्शनाखाली महिला पोलीस कॉन्स्टेबल रुक्मिण पाचपिंडे या तपास करीत आहेत.

घटना स्थळी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाची भेट :- घटनास्थळी बीडच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने भेट देऊन माहिती घेतली

घटनास्थळी चप्पल आणि धारदार शस्त्र :- 

पेट्रोल पंपाच्या झाकणा शेजारी एक धारदार शस्त्र व मोटार लावली त्या ठिकाणी पायातील चप्पल आढळून आली आहे.

कर्मचारी जागे झाल्यामुळे ४१ कॅन मध्ये भरलेले डिझेल वाचले :- कर्मचारी जागे झाल्यामुळे त्यांना डिझेल चोरीची चाहूल लागताच त्यांनी आरडाओरड केली त्यामुळे अर्धे डिझेल वाचले अन्यथा डिझेल चोरीचा आकडा दुप्पट वाढला असता.

No comments