Breaking News

केज पोलिसांची अवैद्य दारू विरुद्ध नऊ हातभट्ट्या विरुद्ध कार्यवाही

गौतम बचुटे । केज 

केज पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक प्रदीप त्रिभुवन व सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष मिसळे यांनी शहरातील नऊ हातभट्ट्यावर धडक कार्यवाही करीत शेकडो लिटर रसायन, हटभट्टीची दारू आणि साहित्य असे मिळून ९४ हजार ५०० रु मुद्देमाल नष्ट केला.

या बाबतची माहिती अशी की, केज पोलीस स्टेशनचे पोलिस निरीक्षक प्रदीप त्रिभुवन व सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष मिसळे यांच्या पथकाने केज येथील हातभट्ट्या आणि दारू विक्री विरुद्ध कार्यवाही सुरू केली. यात मेन रोड, भवानी माळ आणि क्रांती नगर या ठिकाणी सुरू असलेल्या हातभट्ट्या व अवैद्य दारू विक्री यावर कार्यवाही केली दोन हाभट्ट्या नष्ठ करण्यात आल्या तर सात ठिकाणी रसायन आणि हटभट्टीची दारू व दारु काढण्याचे साहित्य असे एकून ९४ हजार ५०० रु चा मुद्देमाल नष्ट करण्यात आला.


 

या कार्यवाहीत पोलीस निरीक्षक प्रदीप त्रिभुवन, सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष मिसळे यांच्या पथकात सहाय्यक फौजदार महादेव गुजर, बाळकृष्ण मुंडे, अशोक नामदास, वाहन चालक हनुमंत गायकवाड यांनी कार्यवाही केली. या प्रकरणी सहाय्यक फौजदार महादेव गुजर यांच्या फिर्यादीवरून सतीश वसंत काळे, शालू नाना काळे, सावित्रा उत्तम काळे, नंदाबाई राजाभाऊ पवार, सुमनबाई सौदागर काळे, सूबाबाई हिरा पवार, शहाजी बाजीराव शिंदे, सूबाबाई मुरलीधर काळे आणि सुरेखा राजेंद्र काळे यांच्या विरुद्ध मुंबई दारू बंदी कायदा ६५ (ई) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. केज पोलिसांच्या या कार्यवाहीमुळे अवैद्य दारू विक्री व हातभट्ट्यावाले यांच्यात खळबळ माजली आहे.

No comments