Breaking News

लिंबागणेश सर्कलमधून पाच हजार मराठा बांधव मोर्चात सहभागी होणार - महाराष्ट्र उसतोड कामगार नेते बबनराव माने


पुढच्या पिढीसाठी रस्त्यावरची लढाई मराठे एकजुटीने लढणार - बबनराव माने 

बीड : मराठा क्रांती संघर्ष मोर्चा पूर्व आढावा बैठकीत मा.आ. विनायकराव मेटे , मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक श्री.बी.बी.जाधव , श्री.मंगेशजी पोकळे , महाराष्ट्र राज्याचे उसतोड कामगार नेते बबनरावजी माने , श्री.सचिनजी कोटुळे , तसेच सुंदरराव भड, विश्वास पाटील, देविदास वाघ, आबा येळवे, दादा गोंदावले, संदिपान बडगे, बालु जाधव , मंगेश माने, तसेच ग्रा.पंचायतचे सरपंच, उपसरपंच, सदस्य, डॉक्टर, इंजिनियर, वकिल, प्राध्यापक, तसेच मराठा समन्वय व पंचक्रोशितील नागरिक बहुसंख्येने उपस्थित होते.

 


साहेब तुम्ही कोर्टाची लढाई लढा... आम्ही रस्त्यावरची लढाई लढतो पुढच्या पिढीसाठीचा लढा आम्ही बालाघाटचे मराठे एकजूटीने लढणार छत्रपतींचा गनिमी कावा काय असतो हे आम्ही या मोर्चा दाखवून देणार आणि या सरकारला सळो की पळो करून सोडणार..सध्या मराठा समाजाला नोकरीतून आणि शिक्षणातून हद्दपार करण्याचं डाव या सरकारचा दिसून येतो छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने सत्ता स्थापन करायची आणी निवडणुका लढायच्या परंतु जेव्हा काही देण्याची खरी वेळ येते तेव्हा सर्व पक्षाचे नेते हे मूग गिळून गप्प बसतात. सुप्रीम कोर्टाने आमच आरक्षण रद्द केल एक नेता तथा एकही पक्ष यावर शब्दसुद्धा बोलायला तयार नाहीत आमचे लाखो तरुण नैराश्याच्या गर्तेत गेलेत तशीच आमची संपूर्ण पिढी उद्ध्वस्त झाली ...तरी या सरकारला जाग येत नाही स्वर्गीय अण्णासाहेब पाटील महामंडळ चालू करावे आणि त्याला भरभरून निधी द्यावा आजच्या तरुणांना EWS आरक्षणाचा तात्काळ लाभ द्यावा.... ज्या बांधवांनी आरक्षणाच्या लढाईत बलिदान दिलं त्यांना प्रत्येकांना ताबडतोब नोकरी मध्ये रुजू करून घ्याव आणि दिलेला शब्द या सरकारने पाळावा अन्यथा त्याचे गंभीर परिणाम या महाविकास आघाडी सरकारला भोगावे लागतील. 

 आ.विनायकराव मेटे यांनी पस्तीस ते चाळीस वर्षापासून आरक्षणाचा लढा लढत आहेत त्यांना या मधल्या सर्व गोष्टी माहिती आहेत.... म्हणून मी तमाम बांधवाना आवाहन करतो की आपण सर्वांनी या लढाईत सहभागी होऊन पाच जूनच्या मराठा क्रांती संघर्ष मोर्चामध्ये आपली बीड जिल्ह्याची ताकद दाखवून द्यावी आणि आपले मोर्चे पाहून महाराष्ट्रातील इतर जिल्ह्यांमध्ये लाखोंचे मोर्चे निघतील... मराठा काय आहे हे आता दाखवून द्यायची वेळ आहे आता हा आणीबाणीचा लढा आहे डोंगरदऱ्या- खोऱ्यातील हा मराठा आपल्या न्याय व हक्कासाठी रस्त्यावर उतरणार आहे. आता हा मूक मोर्चा नसून ठोक मोर्चा असेल. मराठ्यांच्या मनातली ही त्सुनामीपूर्वीची भयाण शांतता आहे .
लिंबागणेश सर्कलमधून पाच हजार मराठा बांधव.... या मोर्चात सहभागी होणार असे उसतोड कामगार नेते बबनरावजी माने यांनी सांगीतले.

No comments