Breaking News

अंबाजोगाई त कोरोनाच्या नियमांना केराची टोपली बाजारपेठेतील तोबा गर्दीने कोरोनाला निमंत्रण…!


शिवाजी भोसले । अंबाजोगाई

जिल्ह्यात कोरोणा संसर्ग झपाट्याने वाढत असल्याने, जिल्ह्यातील प्रशासन हतबल झाल आहे. आज रुग्णांना बेड, रेमडेसीवीर, ऑक्सिजन मिळणं कठीण झालंय. मात्र याला अंबाजोगाईकर गांभीर्याने घेत नसल्याच बोलकं चित्र बाजारपेठेतून दिसून आलं. शहरात कोरोनाचे सर्वच नियमांचा फज्जा उडाल्याचे दिसून आलं. जिल्हाधिकारी रवींद्र जगताप यांनी सकाळी सात ते अकरा या वेळेमध्ये अत्यावश्यक आस्थापना खुल्या ठेवण्यासाठी परवानगी दिली आहे. मात्र हीच परवानगी कोरोनाच्या समूह संसर्गाला मोठ्या प्रमाणात निमंत्रण देत आहे. 

नागरिकांची रस्त्यावरील गर्दी कमी होण्याचे नाव घेत नाहीये. जिल्ह्यामध्ये दररोज कोरोना ग्रस्तांचा पंधराशेचा आकडा पार होतो आहे. असे असताना प्रशासनाकडून नागरिकांना नियम पाळणे आणि काळजी घेण्याचे आवाहन करण्यात येतंय. मात्र ही गर्दी पाहता नागरिकांना कोरोनाची भीती राहिली नाही का.? असाच प्रश्न पडला आहे. शहरातील, छत्रपती शिवाजी महाराज चौक, मंडई  परिसर, बसस्टॅन्ड परिसर, साठे चौक ,अंबेडकर चौक,  वर गाड्या च्या  रांगा लागल्या असून या ठिकाणी नागरिकांनी देखील गर्दी केली आहे. त्यामुळे अंबाजोगाई ची ही गर्दी उद्या मोठ्या प्रमाणात कोरोनाच्या समूहसंसर्गाला कारणीभूत ठरण्याची शक्यता आहे. 


No comments