Breaking News

वंचित बहुजन आघाडी सर्व ताकतीने डिघोळ आंबा येथील वंचित शेतकरी कुटुंबाच्या पाठीशी : -प्रा. शिवराज बांगर


बीड :    दिघोळ आंबा येथील देवस्थानाची जमीन गेल्यावर्षी तीस दलित कुटुंबांनी कसण्यासाठी सामूहिक रित्या 71 हजार रुपयांची बोली लावून घेतली होती. लोकांच्या शेतात जाऊन गुलामगिरी करण्यापेक्षा आपण कष्टाने जमीन कसावी आणी उदरनिर्वाह करावा हा उदात्त हेतू त्या पाठीमागे या कुटुंबाचा होता.

 गेल्या वर्षी कडक लाॅकडाऊन असताना आणि पूर्वीचा ताबा असलेल्या शेतकर्याने, शासनाने ताबा पावती दिल्यानंतरही प्रत्यक्षात या लोकांना ताबा देण्यासाठी  तीन महिन्याचा कालावधी लावला. तरी या कुटुंबानी मेहनतीने शेती कसली. त्याच शेतीची पुन्हा यावर्षीची लावणी ची बोली लावण्याची प्रक्रिया तहसील कार्यालय अंबेजोगाई या ठिकाणी पार पडली अतिशय हीण मानसिकता असलेल्या  प्रस्थापितांनी ही शेती या गरीब दलित कुटुंबांना मिळू नये म्हणून गावस्तरावर बैठक बोलावून या जमिनीचे बोली 7,11000/ (सात लाख अकरा हजार रुपये) एवढी बोलायला लावले एवढे पैसे भरण्याची आमच्या कुटुंबाची पात्रता नाही तरीही लोकवर्गणी करून भूमिहीन शेतकऱ्यांसाठी लढणारे अक्षय  भुम्बे हे स्वतःच्या खिशातील काही पैसे टाकून तसेच वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष प्रा शिवराज बांगर पाटील यांनी कमी पडतील ते पैसे मी स्वतः भरतो आसे सांगीतल्यावर  7,10000/ ( सात लाख दहा हजार) पर्यंत बोली शेतकरी बोलले मात्र या शेतकऱ्यांना जमीन मिळुन द्यावयाची नाही यासाठी पिसळलेल्या गाव गुंडांनी ही बोली वाढवत नेण्याचे ठरवले होते. आज ती जमीन एका शेतकऱ्याला 7,11000/ (सात लाख अकरा हजार रुपये) एवढी बोलीमध्ये मिळाली.

 परंतु त्या अगोदर गावामध्ये लिलाव  झाला तेव्हा कोणीही या प्रक्रियेला उपस्थित नव्हते 71000 हजार रुपयांमध्ये आहे ही जमीन  दलीत कुटुंबातील  शेतकऱ्याला देण्याचा ठराव गावातील बोलीमध्ये झाला होता. असे असतानाही जाणीवपूर्वक तहसीलदारांनी पुन्हा बोली बोलण्याची प्रक्रिया सुरु केली आणि त्या बोली मध्ये गाव गुंडांनी विनाकारण सर्वच  बोली लावत ही शेतजमीन वंचित समूहातील सर्व कुटुंबाच्या हातातून हिसकावून घेण्याचा प्रयत्न केला.  त्या वेळेला हाताश झालेले सर्व कुटुंब आंबेजोगाई तहसील आवारात डोळ्यातून पाणी गळत उभे होते या बोली प्रक्रियेला  वंचित चे जिल्हाध्यक्ष प्रा शिवराज बांगर पाटील, अनिल डोंगरे, ऊसतोड कामगार संघटनेचे जिल्हाध्यक्ष राणबा ऊजगरे आंबेजोगाई शहराचे शहराध्यक्ष अमोल दादा हातागळे, भुमिन शेतकऱ्यांचे नेते अक्षय भुम्बे,अमोल उजगरे इत्यादी सर्व जण उपस्थित होते

 

No comments