Breaking News

गळफास घेऊन एकाची आत्महत्या

केज : बँकेकडून घेतलेले कर्ज कसे फेडायचे या कारणातून तालुक्यातील विडा येथील अनंत लक्ष्मण पटाईत या इसमाने विडा शिवारातील शेतात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे.

          तालुक्यातील विडा येथील रहिवासी अनंत लक्ष्मण पटाईत यांनी विडा येथील महाराष्ट्र ग्रामीण बँकेचे कर्ज घेतले होते. परंतु ते कर्ज कसे फेडायचे या विवंचनेत ते होते. यातच त्यांनी दि.10 मे रोजी सकाळी 7 वाजता विडा येथील शिवारात सीताफळाच्या झाडाला रुमालाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे निदर्शनास आले. गोविंद बालासाहेब पटाईत यांच्या खबरेवरून केज पोलिसांत अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पो.कॉ. मुंडे हे करत आहेत.

No comments