Breaking News

मा.आ.भीमसेन धोंडे यांच्या चुलती व पांडुरंग धोंडे यांच्या आईचे निधन

आष्टी :  आष्टी, पाटोदा, शिरुर विधानसभा मतदारसंघाचे जेष्ठ नेते मा.आ.भीमसेन धोंडे यांच्या चुलती तथा पांडुरंग धोंडे यांच्या आई देऊबाई शंकर धोंडे यांचे वयाच्या ८५ व्या वर्षी आज दि.१३ मे रोजी सायं.०६ वा. निधन झाले.

            आष्टी तालुक्यातील रुईनालकोल येथील पांडुरंग शंकर धोंडे यांच्या आई व मा.आ.भीमसेन धोंडे यांच्या चुलती देऊबाई शंकर धोंडे या गेल्या सहा दिवसापासून कोरोनाशी झुंज देत होत्या परंतु उपचाराला प्रतिसाद न दिल्याने आज अखेर त्यांचे वयाच्या ८५ व्या वर्षी दुःखद निधन झाले. आज सायं.०७:३० वा. कडा येथील स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी मा.आ.भीमसेन धोंडे, सरपंच अनिल तात्या ढोबळे, राजुशेठ रासकर, डॉ.शिवाजी मुळे, प्रा.राम बोडखे, प्रा.डॉ.मुस्ताक पानसरे, पांडुरंग धोंडे, ज्ञानदेव धोंडे, नामदेव धोंडे, प्रा.डॉ.बाळासाहेब धोंडे, प्रा.श्रीकांत धोंडे, शशांक रासकर इव इतर नातेवाईक उपस्थित होते.  देऊबाई धोंडे यांच्या पश्चात पती, मुलगा, मुली, नातवंड, पुतणे व सुना असा मोठा परिवार आहे.No comments