Breaking News

सरस्वती शाळेच्या मुख्याध्यापकास साश्रू नयनांनी श्रद्धांजली


 बीड :   करोनाने निधन झालेले सरस्वती प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक रामराव जरांगे यांना श्रद्धांजली अर्पण करताना संस्थेचे सचिव उत्तम पवार यांना अश्रू रोखणे अनावर झाले तेव्हा उपस्थित सर्वांच्याच नयनांनी अश्रूंना वाट मोकळी करून दिली. 

सरस्वती प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक रामराव जरांगे यांचे नुकतेच करोनाने निधन झाले त्यांना श्रद्धांजली अर्पण करण्याचा कार्यक्रम शाळेच्या प्रांगणात आयोजित करण्यात आला .यावेळी सचिव उत्तम पवार म्हणाले की, सरस्वती विद्या मंदिर ही एक विद्या दान करणारे फक्त विद्यामंदिर नाही तर, तो एक परिवार आहे आणि माझ्याच परिवारातील सदस्याला श्रद्धांजली अर्पण करण्याची वेळ माझ्यावर आली आहे .रामराव जरांगे यांच्या जाण्याने निर्माण झालेली पोकळी न भरून निघण्यासारखी आहे. 

त्यांचे अधुरे कार्य पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करणे हीच त्यांना खरी श्रद्धांजली ठरेल. असे बोलताना सचिव पवार सर यांना गहिवरून आले व त्यांना आपले अश्रू रोखणे अशक्य झाले हे पाहून उपस्थित सर्वांच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले . यावेळी सरस्वती माध्यमिक शाळेचे मुख्याध्यापक प्रशांत पवार यांनी दवाखान्यात रामराव जरांगे यांच्यासोबतचे गेल्या पंधरा दिवसातील दुःखद अनुभव कथन केले .प्रशांत सरांनी दवाखान्यातील दुःखद आठवणींचे एक एक पान उलगडायला सुरुवात करून त्यांना वाचवण्यासाठी केलेल्या धडपडीचे वर्णन केले तेव्हा सर्वांचेच मन हेलावून गेले.      ‌‌.       शाळेच्या प्रांगणात पार पडलेल्या श्रद्धांजली अर्पण कार्यक्रमास संस्थेचे अध्यक्ष बाबासाहेब धुतालमल , प्रवीण पवार ,प्रशासन अधिकारी डॉ. नंदकुमार उघाडे , ज्ञानेश्वर ढोरमारे ,विशाल मेडकर ,सौ उज्वला लाखोळे यांच्यासह शाळेतील सर्व शिक्षकवृंद उपस्थित होते. 


No comments