Breaking News

श्रीक्षेत्र नारायणगड संस्थानच्यावतीने रक्तदान महायज्ञाचे आयोजन


तरुणांनी रक्तदान शिबिरात जास्तीत-जास्त संख्येने सहभागी व्हा: महंत शिवाजी महाराज 

बीड :  श्री क्षेत्र नारायणगड संस्थानच्या वतीने रक्तदान महायज्ञ शिबिराचे आयोजन बीड शहरातील सिंहगड लॉन्स मध्ये मंगळवारी (दि.२५) सकाळी ८ वाजता करण्यात आले असुन या रक्तदान शिबिरात तरुणांनी जास्तीत-जास्त संख्येने सहभागी होण्याचे आवाहन गडाचे महंत शिवाजी महाराज यांच्या वतीने करण्यात आले आहे.

सध्या सर्वत्र कोरोना आजाराने थैमान मांडलेले आहे. संपूर्ण समाज या संकटात होरपळून निघत आहे. अशा संकटसमयी सामाजिक दायित्वाच्या कर्तव्य भावनेने हे शिबिर आयोजित केले आहे. या शिबिराच्या पूर्वतयारीसाठी सिंहगड लॉन्स येथे प्राथमिक आढावा बैठक पार पडली. सध्या सर्वत्र रक्ताचा तुटवडा आहे. या परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन महंत शिवाजी महाराज यांच्या आज्ञेनुसार रक्तदान शिबिराच्या तयारीसाठी चर्चा झाली. या बैठकीत सर्वानुमते सिंहगड लॉन्स  येथे दिनांक २५ रोजी भव्य रक्तदान शिबिर आयोजित करण्याचे ठरले. 

तसेच रक्तदान शिबिराची संपूर्ण पूर्वतयारी करण्यात आली. या बैठकीला श्री क्षेत्र नारायणगड संस्थानचे विश्वस्त दिलीप गोरे, अशोक हिंगे, प्रकाश कवठेकर, भास्करराव जाधव, सीए बी. बी. जाधव, बळीराम गवते, नितीन धांडे, शाहेद पटेल, सुशिल पिंगळे, ॲड महेश धांडे, ज्ञानदेव काशिद, विठ्ठल बहीर, श्रीकांत बागलाने, ॲड योगेश शेळके, धनंजय गुंदेकर, गणेश घोलप, रमेश घोलप, मुकुंद गोरे, आर आर उगले, जयंत वाघ उपस्थित होते. या रक्तदान शिबिरात जास्तीत-जास्त रक्तदात्यांनी रक्तदान करण्यासाठी पुढाकार घेण्याच्यादृष्टीने सांगोपांग चर्चा झाली. श्री क्षेत्र नारायणगड संस्थानच्यावतीने विश्वस्त या नात्याने श्री दिलीप गोरे यांनी बैठकीच्या शेवटी उपस्थितांचे आभार मानले. 


No comments