Breaking News

श्री बृहन्मठ होटगी संस्थेच्या वतीने निशुल्क कोविड केअर सेंटर ची उभारणी करण्याचा मानस


कोरोना बाधीतांसाठी विविध ठिकाणी प्रत्येकी किमान 50 सुव्यवस्थित बेडची मठाधिपती करणार व्यवस्था

प्रशासनाने कोरोना बाधीत रुग्णांसाठी मंजुरी देण्याकरीता डाॅ मल्लिकार्जुन शिवाचार्य महास्वामीजी यांनी दिले विनंतीपत्र

सोलापूर : सद्य स्थितीत महाराष्ट्रात लोक कोरोना महामारीच्या संकटाने हैराण आहेत. झपाट्याने रूग्णसंख्येत होणार्या वाढिमुळे प्रशासनावर खुप मोठं अवाहन निर्माण झाले आहे.या भिषण परिस्थितीत सोलापूर जिल्ह्यातील श्री बृहन्मठ होटगी संस्थेने निशुल्क कोविड केअर सेंटर ची उभारणी करण्याचा मानस मनी धरत संस्थेच्या सहा ठिकाणी प्रत्येकी किमान 50 बेडची व्यवस्था होईल अशी तयारी दर्शविली आहे,प्रशासनाने कोरोना बाधीत रुग्णांसाठी तात्काळ मंजुरी देण्याची विनंती मठाधिपती डाॅ मल्लिकार्जुन शिवाचार्य महास्वामीजी यांनी केली आहे. 

सोलापुर जिल्हापरिषदेचे मुख्यकार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांनी सोलापुर जिल्हा कोरोनामुक्त करण्यासाठी विविध उपक्रम राबवीत आहेत गाव तेथे कोविड सेंटर,महिला रूग्णासाठी उपचार महिला डॉक्टर कडुन करण्यात यावे,ताणतणावमुक्त मार्गदर्शन शिबीर,गावागावात जाऊन कोरोना विषयी जनजागृती केली जात आहे. व्हिडीओ ऑडीवो च्या माध्यमातुन ग्रामिण भागात देेखील कोरोना प्रतीबंध त्रिसुत्री अभियान असे अनेक उपक्रम हाती घेतले असुन या अवाहनास मठाधिपती १०८ श्री.ष.ब्र.धर्मरत्न डॉ. मल्लिकार्जुन शिवाचार्य महास्वामीजी यांनी साद दिली आहे.मठाधिपतींनी सद्यपरिस्थितीत कोरोना ची भिषणता व गोरगरिबांचे होणारे हाल पाहुन सामाजिक जाणिवेतून शेकडो बेड तथा जेवनाची व्यवस्था करण्यासाठी तयारी दर्शविली आहे. 

सोमवारी  3 मे रोजी श्री बृहन्मठ होटगी मठाचे मठाध्यक्ष श्री धर्मरत्न डॉ मल्लिकार्जुन शिवाचार्य महास्वामीजींच्या हस्ते मौजे होटगी,कुंभारी,धोत्री,अरळी,बोरामणी, सोलापूर भवानी पेठ.अशा सहा ठिकाणी सर्व सोयी सुविधा युक्त क्वारंटाईन सेंटर व होटगी या ठिकाणी सर्वसोयी सुविधांनी युक्त क्वारंटाईन सेंटरची उभारणी करण्यात येनार असुन शासनाच्यावतीने ते वापरण्यात यावे या करीता एक विनंती पत्र  सोलापूर जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांच्या माध्यमातून प्रशासनाला विणंती केली आहे. 

श्री बृहन्मठ होटगी संस्था हि सदैव सामाजीक दातृत्वाची जानीव ठेवत व सदैव लोकोपयोगी उपक्रम हाती घेऊन समाजसेवा करण्यासाठी सदैव तत्पर असते. मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी  व पुज्य महास्वामीजी यांच्या मध्ये धार्मिक व सामाजिक विषयांवर चर्चा झाली. या प्रसंगी संस्थेचे सचिव श्री एस.जी.स्वामी सर व संस्थेचे संचालक श्री शशिकांत रामपूरे साहेब व  बी.डी.ओ. (सोलापूर) उपस्थित होते. दरम्यान मठाधिपतींच्या या उदात्त भुमिकेचे सर्वत्र कौतुक केले जात आहे. 


No comments