Breaking News

कोरोना काळात आ. बाळासाहेब आजबे मित्र मंडळ आरोग्यदूतच्या भूमिकेत


असंख्य रुग्णांना अविरत मतदकार्य सुरूच

आष्टी :  मागील दोन वर्षांपासून कोरोना महामारीत आ बाळासाहेब आजबे मित्र मंडळ मदत नव्हे कर्तव्य या भूमिकेतून जनसेवेत सक्रिय असून आजतागायत अनेक समाज उपयोगी कार्य मंडळाने केले आहेत.

 

मतदारसंघातच नाही तर शेजारील अहमदनगर जिल्ह्यात देखील मंडळाने मदतकार्य केले आहे. दिवसरात्र मंडळाचे सहकारी रुग्ण, रुग्णांचे नातेवाईक, आरोग्य व पोलीस कर्मचारी तसेच गरीब, सर्वसामान्यांना पर्यंत सर्वोतोपरी मदत पोहच करण्याचा प्रामाणिक प्रयत्न करत आहेत. मंडळाचे सर्वच मदतकार्य उल्लेखनीय असल्याचे प्रमाणपत्र देखील शासनाने प्रदान केले आहे. 

         पहिल्या टाळेबंदमध्ये आ बाळासाहेब आजबे मित्र मंडळाच्या वतीने आष्टी पाटोदा शिरूर या विधानसभा मतदारसंघात गरजूंना मोफत किराणा व भाजीपाला वाटप, शासकीय अधिकारी, कर्मचारी यांना आर्सेनिक अल्बम या होमिओपॅथी औषधांचे मोफत वाटप तसेच जिल्हाधिकारी मार्फत घेण्यात आलेल्या अँटीजन कॅम्पमध्ये सेवा देणारे आरोग्य व पोलीस कर्मचारी यांना सलग पाच दिवस मोफत जेवण देण्यात आले होते. सध्या देखील कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा कहर दिवसेंदिवस वाढत असून अशा कठीण काळात ही आ बाळासाहेब आजबे मित्र मंडळाने रुग्ण व त्यांचे नातेवाईक, आरोग्य व पोलीस कर्मचारी यांना सर्वतोपरी मदत करण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला व करत आहेत.

                मध्यंतरी राज्यात कोरोना रुग्णांच्या उपचारात जीवनदायी ठरत असेलेल्या रेमडीसीविर या इंजेक्शनचा मोठ्या प्रमाणात तुटवडा झाला होता. इंजेक्शनचा काळा बाजार सुरु झाल्याने अनेक रुग्णांचे हाल देखील झाले. चढ्या भावाने हे इंजेक्शन बाजारात मिळत असताना आ बाळासाहेब आजबे मित्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष संदीप सुंबरे, अशोक पोकळे, नाजीम शेख, राम गोंदकर, राजेंद्र जारांगे, सतीश सोले, अतुल शिंदे, भाऊसाहेब घुले यांनी आ. आजबे यांच्या मदतीने जिथे शक्य होईल तिथे तीनशेहून अधिक रेमडीसीविर इंजेक्शनचे मोफत वाटप केले.

 याचबरोबर आष्टी येथील ट्रामा केअर सेंटर मध्ये सुरू केलेल्या कोव्हीड सेंटरच्या जागेत सकाळच्या उन्हामुळे रुग्णांना त्रास होत असल्याचे लक्षात येताच त्याठिकाणी मंडळाच्या सहकाऱ्यांनी ताबडतोब ऊन येत असलेल्या जागेत कापड टाकून रुग्णांनासाठी सावली केली. तसेच आयटीआय येथील कोव्हीड सेंटर येथे सुरक्षा देणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांना सावली मिळावी यासाठी देखील कापडी छताचे टेंट टाकण्याचे काम मंडळाच्या वतीने करण्यात आले. तसेच आष्टी पाटोदा शिरूर येथील शासकीय कोव्हीड सेंटर मध्ये रुग्णनांनासाठी रोगप्रतिकारक शक्ती वाढविणारे फळे, जारचे शुद्ध पाणी, वेळेवर उपलब्ध न होत असलेली महत्वाचे औषधे उपलब्ध करून आ बाळासाहेब आजबे मित्र मंडळाने हे दाखवून दिले आहे की पुढाऱ्यांच्या किंवा एखाद्या महापुरुषांच्या नावाने सुरू केलेले मित्र मंडळ फक्त राजकीय फायद्यासाठी न वापरता त्या मित्र मंडळाचा वापर सर्वसामान्य, गरीब तसेच समाजातील प्रत्येक घटकासाठी व्हावा हा असावा तरच ते मित्र मंडळ स्थापन करावे.

No comments