Breaking News

'गावागावात राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस' - सुनिल गव्हाणे

शिरूर कासार : गाव पातळीवर संघटना मजबुतीसाठी प्रत्येक गावात आणि खेड्यात राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस पोहोचवण्या संदर्भात नुकतेच प्रदेशाध्यक्ष सुनिल गव्हाणे, विभागीय अध्यक्ष प्रशांत कदम व जिल्हाध्यक्ष पंकज बाहेगव्हाणकर यांनी बीड जिल्हा पदाधिकारी व तालुकाध्यक्ष यांना सुचना केल्या आहेत. ही मोहीम प्रक्रिया बीड जिल्ह्यात सुरू झाली असल्याची माहिती जिल्हा सरचिटणीस प्रणव मंगरुळकर यांनी दिली.

आष्टी, पाटोदा, शिरूर या तीन तालुक्याच्या कार्यकारिणीची जबाबदारी प्रणव मंगरुळकर यांच्याकडे सोपवली असुन येणाऱ्या महिन्याभरात राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसची व्याप्ती तालुका पातळीपासून पुढे गाव, खेड्याच्या पातळीपर्यंत आणि प्रभाग पातळीपासून शाखा पातळीपर्यंत कश्याप्रकारे करता येईल याचे सर्व मार्गदर्शन वरिष्ठांकडून व्हिडिओ कॉन्फरन्स द्वारे करण्यात आले. 


No comments