Breaking News

दिलीप रोडे यांचे दु: खद निधन


परळी : येथील नगर परिषदचे सहाय्यक कार्यालयीन अधीक्षक दिलीप रोडे यांचे राञी 1-15 वाजण्याच्या सुमारास लातूर येथील एका खाजगी रुग्णालयात उपचारादरम्यान दुःखद निधन झाले आहे.

दिलीप रोडे हे काही दिवसापुर्वी कोरोना पाॕझिटिव झाले होते.काही दिवस त्यांनी कोरोनावर उपचार घेऊन त्यातुन यशस्वी बाहेर पडले होते.परंतु परत त्यांची प्रकृती खालावत जात असल्याने त्यांना लातुर येथील एका खाजगी रुग्णालयात उपचारासाठी भरती करण्यात आले होते.त्यातच उपचारा दरम्यान मंगळवार दि.18 मे रोजी पहाटे 1-15 वाजण्याच्या सुमारास त्यांनी अखेरचा श्वास घेतल परळी नगर परिषदेत त्यांनी 30 वर्ष सेवा दिली असुन ते आत्ता सहाय्यक कार्यालयीन अधिक्षक पदावर कार्यरत होते.न.प.मधील एक आदर्श अधिकारी म्हणुन त्यांच्याकड पाहीले जात होते.प्रत्येकासी जिवाळ्याचे नाते होते अश्या सुस्वभावी व्यक्तीला आपण गमावल्याची भावना व्यक्त होत आहे. दिलिप रोडे यांच्या पश्चात पत्नी,तीन मुली एक मुलगा,भाऊ असा परिवार आहे.रोडे परिवारावर कोसळलेल्या दुःखात दृष्टीकोन न्यूज परिवार सहभागी आहे.

No comments